News Flash

वाहनप्रेमींची उत्सुकता शिगेला नेणाऱ्या ‘टेस्ला’ कार भारतात कधी येणार? इलॉन मस्क म्हणतात…

चार वर्षांपूर्वीच 'टेस्ला' कार बुक करणाऱ्या भारतीयाने विचारलेल्या प्रश्नावर मस्क यांचं उत्तर

जगभरातील वाहनप्रेमींची उत्सुकता शिगेला नेणाऱ्या बहुप्रतिक्षित टेस्ला या विजेवर चालणाऱ्या कारची चाके प्रत्यक्षात भारतातील रस्त्यांना स्पर्श कधी करणार? असा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून सतत विचारला जातोय. इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या कार जगभरात चर्चेत आहे. टेस्लाच्या अद्ययावत व तंत्रस्नेही विद्युत कारबाबत जगभरात उत्सुकता आहे. भारतातही टेस्लाचे बरेच चाहते आहेत. पण अद्याप भारतात टेस्लाच्या कार उपलब्ध झालेल्या नाहीत.

मात्र, आता लवकरच टेस्ला मॉडेल-३ कार भारतात येण्याची शक्यता आहे. टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकार इलॉन मस्क यांनी तशाप्रकारचे संकेत दिले आहेत. ट्विटरवर एका भारतीयाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना मस्क यांनी तसे संकेत दिले आहेत. चार वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक टेस्ला मॉडेल-3 साठी बुकिंग करणाऱ्या अरविंद गुप्ता या युजरने ट्विटरवर, ‘डिअर इलॉन मस्क, भारतात टेस्ला-3 कधीपर्यंत येईल? बुकिंग करुन चार वर्षांपेक्षा जास्त वेळ झाला आहे’, असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना ‘लवकरच लाँचिंग होईल अशी अपेक्षा आहे,’ अशा आशयाचं उत्तर मस्क यांनी दिलं आहे.


यापूर्वी मस्क यांनी, भारत सरकारच्या थेट विदेशी गुंतवणूकविषयक धोरणाबाबत नाराजी व्यक्त करताना ही धोरणे टेस्लाच्या वाहनांचे भारतातील पदार्पण लांबवत असल्याचा ठपका ठेवला होता. यानंतर, गेल्या वर्षी चेन्नईच्या ‘मद्रास आयआयटी’च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना इलॉन मस्क विद्यार्थ्यांकडून अपेक्षेप्रमाणे आलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल, ‘टेस्ला २०२० मध्ये नक्की भारतात येईल’, असे म्हणाले होते. “चालू वर्षातच टेस्ला भारतात आणायला आम्हाला आवडले असते; मात्र तूर्त तरी त्याबाबत आश्वासक वातावरण नाही. परिणामी पुढच्या वर्षी ती नक्की येथे येईल”, असे ते म्हणाले होते.

दरम्यान, सध्या टेस्लाची आशियातील मार्केटमध्ये फक्त चीनमध्येच उपस्थिती आहे. अन्य कोणत्याही मार्केटमध्ये अद्याप टेस्ला उपलब्ध नाही. पण आता इलॉन मस्कने ट्विटरवर दिलेल्या उत्तरामुळे भारतीय रस्त्यांवर लवकरच टेस्लाच्या कार धावताना दिसतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. .

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 1:36 pm

Web Title: when will tesla model 3 arrive in india elon musk hints again sas 89
Next Stories
1 Realme चा ‘बजेट’ स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी, एकूण पाच कॅमेऱ्यांसह 5000mAh ची दमदार बॅटरी
2 48MP कॅमेऱ्यासह 5,000mAh ची दमदार बॅटरी, Redmi Note 9 Pro खरेदी करण्याची पुन्हा संधी
3 पाच कॅमेऱ्यांच्या नवीन Poco फोनचा भारतातील पहिलाच ‘सेल’, जाणून घ्या ऑफर
Just Now!
X