News Flash

“कामाचे जास्त तास ठरु शकतात जीवघेणे”; WHO च्या अभ्यासातून धक्कादायक आकडेवारी उघड

आठवड्याला ५५ किंवा त्याहून जास्त तास काम केल्याने वाढतो मृत्यूचा धोका

संग्रहित (Source: Thinkstock Images)

जास्त तास काम करणं अनेकांसाठी जीवघेणं ठरत असून वर्षाला हजारोंच्या संख्येने होणारे मृत्यू चिंतेची बाब असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. करोनामध्ये मृत्यूची ही संख्या अजून वाढण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. कामाच्या जास्त तासांमुळे होणाऱ्या मृत्यूशी संबंधित जागतिक अभ्यासात ही माहिती उघड झाली आहे. अभ्यासानुसार, २०१६ मध्ये जास्त तास काम केल्यामुळे ७ लाख ४५ हजार लोकांचा स्ट्रोक तसंच ह्रदयाशी संबंधित आजारांमुळे मृत्यू झाला.

२००० च्या तुलनेत ही वाढ ३० टक्क्यांनी जास्त आहे. “आठवड्याला ५५ किंवा त्यापेक्षा जास्त तास काम करणं आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे,” असं जागतिक आरोग्य संघटनेतील पर्यावरण, हवामान बदल आणि आरोग्य विभागाच्या प्रमुख मारिया यांनी सांगितलं आहे. पावलं उचलली जावीत, तसंच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा काळजी घेतली जावी यासाठी आम्ही ही माहिती प्रसिद्ध करत आहोत असंही त्यांनी सांगितलं आहे.

जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय कामगार संस्थेकडून संयुक्तपणे करण्यात आलेल्या अभ्यासात सर्वाधिक मृत्यू होणाऱ्यांमध्ये पुरुष असून हे प्रमाण ७२ टक्के आहे. त्यातही मध्यम किंवा वयस्कर जास्त आहेत. यामध्ये सर्वाधिक नागरिक आग्नेय आशिया आणि पश्चिम प्रशांत महासागर परिसरातील देशांमधील आहेत, ज्यामध्ये चीन, जपान, ऑस्ट्रेलियामधील नागरिकांचा समावेश आहे.

अभ्यासानुसार, १९४ देशांमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार आठवड्याला ३५ ते ४० तास काम करण्याच्या तुलनेत ५५ किंवा त्याहून जास्त काम केल्याने स्ट्रोकची शक्यता ३५ टक्के तर ह्रदयाशी संबंधित आजाराने मृत्यू होण्याची शक्यता १७ टक्क्यांनी वाढते.

हा अभ्यास २००० ते २०१६ दरम्यान करण्यात आलेला असून करोना काळाचा समावेश नाही. मात्र करोनामुळे वर्क फ्रॉम होमची संख्या वाढली असून खालावणारी अर्थव्यवस्था यामुळे धोका अजून वाढला आहे. करोनामुळे घरुन काम करण्याचं प्रमाण वाढत असून किमान नऊ टक्के लोक जास्त तास काम करत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2021 12:35 pm

Web Title: who study shows long working hours are a killer sgy 87
Next Stories
1 अनधिकृत सॉफ्टवेअरचा धोका
2 रस्ता सुरक्षा, जीवन रक्षा
3 Covid-19 Vaccine Registration : लसीसाठी नोंदणी कशी कराल?; जाणून घ्या सहा सोप्या स्टेप्समध्ये
Just Now!
X