चर्चा
टिम युथफूल – response.lokprabha@expressindia.com

नेमेचि येणारा महिला दिन आला की मग त्यानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम सुरू होतात. विविध उपक्रम, सक्षमीकरण वगरे चर्चासत्रं, विविध दुकानांतून आकर्षक सवलतींचे फलक वगरे सारे उत्सव सुरू होतात. पण आजच्या पिढीच्या नजरेतून महिला दिनाचे महत्त्व नेमके आहे का हेदेखील एकदा तपासून पाहायला हवे. त्यानिमित्ताने ‘लोकप्रभा’च्या युथफूल टिमने याविषयी केलेली चर्चा.

मृणाल भगत : हा प्रश्न मुलींना विचारण्यापेक्षा मुलांना विचारण्याची गरज आहे. त्यांना काय वाटतं, खरंच गरज आहे का? तात्त्विक विचार बाजूला ठेवून आजच्या स्त्रीबद्दल त्यांना काय वाटते?

3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
mahesh manjrekar
“सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चित्रपट बनवणार”, महेश मांजरेकरांचं वक्तव्य; शिवसेना-मनसेबाबतही केलं भाष्य

जयदेव भाटवडेकर : महिला दिनाचा उद्देश मुलींना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देणे हा असेल तर मला दिवसांची गरज वाटते. मला असे वाटते की आजच्या पिढीतील शहरात राहणाऱ्या मुलींनादेखील याची जाणीव नाहीये.

वेदवती चिपळूणकर : महिला दिन हा वूमनहूड साजरा करण्यासाठी असतो की, स्त्री पुरुषापेक्षा वरचढ असते असं सिद्ध करण्याचा प्रयत्न असतो? वूमनहूडचं सेलिब्रेशन आणि पुरुष करतात तर मग आम्ही का नाही? म्हणून सगळ्याच बाबतीत कारण नसताना बरोबरी करणं या दोन वेगळ्या आणि दोन टोकाच्या गोष्टी आहेत. कोणत्या उद्देशाने आपण हा दिवस साजरा करतो त्यावर त्याची गरज ठरेल. क्षमतांची जाणीव आपल्याला नाही हे विधान पाहिलं तर क्षमता म्हणजे नक्की कोणत्या क्षमता हा खूप महत्त्वाचा प्रश्न ठरतो, असं मला वाटतं. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहण्याची क्षमता, की त्यांच्या पुढे जाण्याची क्षमता, की स्वतची ओळख घडवण्याची क्षमता यातल्या नक्की कशाची जाणीव व्हायला हवी आहे ? कोणत्या क्षमतेची जाणीव होण्याची गरज आहे?

पुरुष सिगरेट ओढतो म्हणून आपणही ओढण्याची क्षमता ओळखायची आहे की फायटर प्लेन उडवण्याची क्षमता ओळखायची आहे? फक्त छोटय़ा चड्डय़ा घातल्या म्हणजे आपली क्षमता समजली की साडी, कुंकू, टिकली लावूनही आपली क्षमता दाखवता येते?

नक्की अपेक्षित काय आहे हे कळलं तरच दिवसाची गरज आहे की नाही हे ठरवता येईल

गायत्री हसबनीस : छोटय़ा चड्डय़ा, बिकीनी घालणाऱ्या, त्या किती कर्तृत्ववान आहेत, असे म्हणणारेही आणि त्यांचा आदर्श ठेवणारेही आहेत. आणि साडी नेसून, कुंकू लावून, डोक्यावर पदर घेऊन असलेल्या महिलांसुद्धा, त्या किती कर्तृत्ववान आहेत आणि त्याचबरोबर त्यांचा आदर्श ठेवणारेही आहेत.

प्रियंका वाघुले : बदलत जाणारी स्त्रीची फॅशन आणि त्याचबरोबर बदलत जाणारे किंवा प्रगल्भ होणारे तिचे विचारदेखील लक्षात घ्यायला हवेत. कारण चुकीच्या, न पटणाऱ्या गोष्टींवर टीका सगळेच सहज करतात. मग ते पुरुष असो किंवा स्वत स्त्री. पण स्त्री म्हणून विचारांत, वागणुकीत, कर्तृत्वाच्या दृष्टीने झालेली प्रगल्भता जास्त महत्त्वाची ठरते.

गायत्री हसबनीस : तुमचे कर्तृत्व अमुक एक केलंच म्हणून तुम्ही कर्तृत्ववान आहात असा विचार आता राहिला नाही, असं मला वाटतं. ‘सेक्रेड गेम्स’मध्ये राजश्री देशपांडेने जो रोल केला तो किती धाडसी होता, निर्णय किती सर्वतोपरी घेतला, तिने या भूमिकेतून किती कौतुक, कर्तृत्व गाजवले म्हणून आज ती ‘त्या’ रोलमुळे ‘एक कर्तृत्ववान युवती’ म्हणून ओळखली जातेय. तिने तिच्या क्षमता सिद्ध केल्या.

राधिका कुंटे : पेहराव, स्वतला सिद्ध करण्याची क्षमता, विचारसरणी, आदर्श या सगळ्या गोष्टी व्यक्तीसापेक्ष आहेत. त्यात स्त्री-पुरुष भेदभाव/समानता या बाबींचा विचार/ प्रभाव हाही त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. तुमचे कर्तृत्व अमूक एक केलंच म्हणून तुम्ही कर्तृत्ववान आहात असा विचार आता राहिला नाही हे मत पटते.

प्रियंका वाघुले : अगदीच. कारण एखादं बोल्ड पात्र केले म्हणजे ती व्यक्ती तशीच असण्याचा शुद्ध गरसमज बाळगणं कितपत योग्य. त्यांना दिलेल्या भूमिकेत ते काम करत असतात. त्या भूमिका साकारण्यासाठीही त्यांना तितकीच मेहनत करावी लागते, जितकी इतर भूमिका साकारण्यासाठी.

राधिका कुंटे : त्यातही स्त्री-पुरुष भेदभाव नसावा.

गायत्री हसबनीस : पेहराव, स्वतला सिद्ध करण्याची क्षमता, विचारसरणी, आदर्श या सगळ्या गोष्टी माझ्या मते एकमेकांना जोडलेल्या आहेत. जसा आदर्श तशी क्षमता ओळखून तशी स्वत:ला सिद्ध करण्यासाठीची धडपड आणि पेहेरावात असे.

प्रियंका वाघुले : कदाचित जास्त प्रमाणात मेहनत. कारण अशा प्रकारच्या पात्रांवरून नंतर त्यांच्या सोशल मीडियावर जो गोंधळ घातला जातो, त्यांना बोल लावले जातात. तेही भयंकर असतं.

गायत्री हसबनीस : अगदी बरोबर. हाच विचार आज सगळ्या महिला कलाकार मोडण्याचा प्रयत्न करत आहेत. जो अजूनही होत नाहीये. त्यावर पुरुषांकडूनच काय महिलांकडूनही टीका होतेय.

मृणाल भगत : मुळात फेमिनिजम स्त्री आणि पुरुषांना समान संधींची मागणी करत जर स्त्रियांमध्येच कपडे, सेट्समधून भेद पडत असतील; अमुक पेहराव म्हणजे मॉडर्न आणि तमुक म्हणजे गावठी असं मानलं गेलं तर फेमिनिझमचा मूळ उद्देश बाजूला पडेल. स्वतच वैयक्तिकपण साजरं करून स्वतला सिद्ध करायची धडपड या चळवळीत अपेक्षित असते. मग तुमचं िलग, जात, धर्म, पेशा, आíथक स्तर काहीही असो.

गायत्री हसबनीस : पण हा मुद्दा जरा वेगळा आहे.

वेदवती चिपळूणकर : मुद्दा तोच आहे की, कपडे, मेकअप, काम यामध्येच आपण फेमिनिझमला अडकवून ठेवलंय. त्यामागचा विचार आणि प्रत्यक्षातली परिस्थिती हे सगळं बाजूलाच पडतंय. फेमिनिस्ट होणं म्हणजे छोटे कपडे घालणं हे बाह्य़ स्वरूप आहे ज्याला फेमिनिझमचा गाभा असल्यासारखं अडॉप्ट केलं जातंय आणि मूळ उद्देश बाजूलाच पडतोय.

प्रियंका वाघुले : स्त्रीच स्त्रीला मागे ओढते. फॅशनमध्येही ही आणि विचारांमध्ये देखील.

गायत्री हसबनीस : तो मानसिकतेचा

भाग झाला.

मृणाल भगत : याचं उत्तम उदाहरण म्हणजे जमिला जमील या अभिनेत्रीचं हे इन्स्टाग्राम पेज. स्त्रियांवर होणाऱ्या बॉडी शेिमगच्या (body shamming) टीका, अवास्तव सौंदर्याच्या पातळ्यांच्या विरोधात हॉलीवूडच्या या अभिनेत्रीने इन्स्टा पेजद्वारे मोहीम काढली. तरुणींना बोलायची संधी दिली. व्यक्त व्हायला जागा दिली. पण त्याच वेळी तिच्यावर टीकासुद्धा झाली की, ती स्वत: फिट आहे, सौंदर्यवती या व्याख्येत बसणारी आहे मग ती बॉडी शेिमगबद्दल कसं बोलू शकते? किंबहुना तिने बोलू नये. ज्याचं जळत त्यालाच कळतं. ही मनोवृत्ती आहे. त्यावर तिनेही प्रश्न केला की, माझी शरीररचना बाजारू परिमाणात बसते, म्हणून मला या प्रश्नांची जाण नाही, असं का वाटतं?

प्रज्ञा सावंत : जसा विज्ञान दिन, मराठी भाषा दिन किंवा असे इतर दिन जे दर ३६४ दिवसांनी येतात आणि जातात, त्या दिनांप्रमाणेच हा दिन ही माझ्यापुरता तरी येतो आणि जातो.

तेजश्री गायकवाड : मला स्वतला या डेची काही गरज आहे असं अजिबात वाटत नाही. फक्त त्याच दिवशी किंवा त्याआधी नंतर एकदोन दिवस यावर अखंड चर्चा होते. या चच्रेतून काहीच मिळत नाही. फक्त महिला पुरुषापेक्षा कशी पुढे आहे, पुरुष कसे महिलांसोबत चुकीचे वागतात, याशिवाय त्यातून काहीच बाहेर येत नाही. खरतर हा डे म्हणजे अजून एक हक्काचा दिवस आहे सेलिब्रेशनसाठी. महिलांना, मुलींना ऑफिशली पार्टी करता येते. या पलीकडे काहीच होत नाही. शाळा-कॉलेजमध्येही खास असं काही होत नाही. एकीकडे आपण पुरुष आणि स्त्री समान आहेत असं बोलतो आणि दुसरीकडे महिला दिवस मात्र सेलिब्रिट करतो. अशा वेगळ्या दिवसाची गरज आहे नाहीच.

वेदवती चिपळूणकर : हे पटतंय. जर समान आहे तर त्यातल्या एका घटकासाठी वेगळा डे नको.

मृणाल भगत : पुरुषांचा दिवससुद्धा असतो, तो तितक्या जोशात साजरा केला जात नाही यामागे व्यावसायिक गणितं आहेत बाकी काही नाही. मला स्वतला हे डेज वगरे प्रकरण पटतं नाही, कारण सध्या हे फक्त व्यावसायिकीकरण झालंय बाकी काही नाही.

तेजश्री गायकवाड : पुरुष तो दिवस जास्त मोठय़ा जोशात साजरा करत नाहीत. आणि मग पोस्टरूपी, युट्यूबवर व्हिडीओ टाकून पुरुष रडत असतात. महिला दिनानिमित्ताने मोठे ब्रॅण्ड्स ऑफर देतात, डिस्काउंट देतात. आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी अनेकदा काही ना काही करतात आणि पोस्ट करतात

मृणाल भगत : मुळात या सगळ्यांमध्ये मूळ मुद्दा बाजूला राहतो. भलेही महिला दिनाचे महत्त्व आज कमी झालं आहे, पण प्रश्न अजून संपले आहेत का? आजही स्त्री मी स्वतंत्र आहे, मला माझ्या मनाप्रमाणे, मताप्रमाणे जगता येतं, विचार मांडता येतात हे ठामपणे म्हणू शकते का? अजूनही ती पुरुषाकडे ऑप्रेसर म्हणून बघते की पार्टनर म्हणून पाहते? पुरुष स्त्रियांकडे कोणत्या नजरेने पाहतात, त्यांच्या मनाला समानतेची भावना पटते का? म्हणून मी म्हटलं मुलांनी बोललं पाहिजे. त्यांची मतं आज महत्त्वाची आहेत. आज दोन्ही बाजूच्या मानसिकतेमध्ये बदल घडला आहे का हे बघायची गरज आहे. आणि ही सर्व चर्चा कपडय़ांवर येऊनच का थांबते?

स्नेहल जंगम : जसं इथे प्रत्येकाने महिलांना त्यांच्या हक्कांची, क्षमतांची जाणीव करून देण्यासाठी वर्षांतला फक्त एक दिवस साजरा करून काय होणार आहे, असं मत मांडलंय तसंच काहीसं माझंही आहे. पण जगात असे अनेक दिवस साजरा करण्यामागे नक्कीच काही ना काही तरी हेतू असतो. उदा. आपण दहा डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिन साजरा करतो. मानवी हक्क मिळवण्यासाठी केलेल्या लढय़ाची जाणीव आपल्याला व्हावी आणि आपणही सतत आपल्या हक्कांसाठी लढलं पाहिजे याची जाणीव करून देण्यासाठी आपण हा दिन साजरा करतो. अगदी तसंच महिलांनाही त्यांच्या हक्कांसाठी, स्वातंत्र्यासाठी, वर्षांनुवष्रे त्या ज्या रूढी, परंपरांमध्ये खितपत पडल्या होत्या त्यातून त्यांना बाहेर काढून अनेकांनी त्यांच्यासाठी केलेल्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आणि सतत आपल्या हक्कांसाठी लढण्याकरता जागृत राहण्यासाठी एक प्रेरणा म्हणून जागतिक महिला दिन साजरा केला जातो. (किंवा केला जात असावा).

महिलांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस असावा का? तर क्षमतेपेक्षा हक्क हा शब्द जास्त योग्य वाटतं. याचं मला उमगलेलं कारण असं की जितपत आपण महिलांच्या क्षमतेबद्दल बोलतो तितपर्यंत एक माणूस म्हणून ती क्षमता त्याची त्यांना अगदी योग्य प्रकारे नक्कीच ओळखता येते. एक स्त्री म्हणून त्यांना काही विशेष क्षमता निसर्गाने बहाल केल्या आहेत. ज्यांची जाणीव त्यांना करून द्यावी लागत नाही. आता याव्यतिरिक्त एक माणूस म्हणून आपलं जीवन उन्नत आणि सुखकरपणे जगण्यासाठी आपल्याला ज्या क्षमता हव्या असतात त्या आपण वेळोवेळी विकसित करत असतो. फरक फक्त इतकाच असतो की पुरुषांना त्या क्षमता ओळखून त्यांची अंमलबजावणी करता येते. कारण हा पित्रुसत्ताक समाजाच्या विचारसरणीचा भाग आहे. स्त्रियांना मात्र या क्षमतांची जाणीव लवकर होत असूनसुद्धा त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागतो. पण जेव्हा आपण ‘हक्कांबद्दल’ बोलतो तेव्हा मात्र चित्र वेगळं असल्याचं जाणवतं. माझ्या प्रगतीसाठी जर मला माझ्या घरात योग्य वातावरण मिळत नसेल तर घर सोडून जाऊन, स्वत च्या पायावर उभं राहून स्वतंत्र्यपणे जगण्याचा हक्क प्रत्येक स्त्री-पुरुषाला आहे. पण आपल्या जडणघडणीच्या बाबतीत कोणताही (योग्य) निर्णय घेण्याचा हक्क आपल्याला आहे हे बऱ्याचदा माहीत नसतं. किंवा माहीत असूनही कुटुंबव्यवस्थेत आपण इतके गुरफटलेलो असतो की तसं काही करण्याचा विचारही आपल्या मनात येत नाही. आणि एखाद्याने तसं पाऊल उचललंच तर त्याला ‘बंडखोर’ असल्याचं लेबल लावायला आपण तयार असतोच की.

भर उन्हात अंगभर काळ्या बुरख्यात (काळा रंग शरीरात उष्णता शोषून घेतो) वावरणं झुगारून देऊन उन्हाच्या जास्त झळा लागणार नाही म्हणून कमी कपडे घालणे हासुद्धा माझा हक्क आहे, हे तरी किती स्त्रियांना माहीत आहे? मला जर समाजाची बंधनं पटत नसतील तर त्या बंधनांना झुगारण्याचा हक्क मला आहे हे किती स्त्रियांना माहीत आहे? (किंवा माहीत असूनही किती स्त्रिया ती बंधनं झुगारतात?) मला जर लग्न करणे, बंधनांनी व्यापलेल्या कुटुंबव्यवस्थेत राहणे मान्य नसेल तर जन्मभर एकटं राहून माझं जीवन आनंदानं जगण्याचा हक्क मला आहे हे किती स्त्रियांना माहीत आहे? अर्थात उत्तर नकारात्मक येईल! माझा सांगण्याचा हेतू इतकाच आहे की या महिला दिनानिमित्त महिलांच्या हक्कांची व्याप्ती ही फक्त न्याय, अन्याय इथपर्यंत मर्यादित न राहता ती त्याही पुढे जाऊन विचार करण्याची गरज आहे.

आता फक्त महिला दिनच का साजरा करायचा पुरुष दिन का नाही असा प्रश्नही काही अतिभावनाशील(?) परुषांकडून विचारला जातो. तर त्याचं उत्तर असं की जितक्या प्रमाणात झळ, िहसा, अन्याय, मारपीट, पारतंत्र्य, अमानवीय कृत्यं स्त्रियांसोबत झाली तेवढं पुरुषांबाबतीत खरंच कमी झाले आहे. आजही एखाद्या स्त्रीला तिच्या नवऱ्यातील कमतरतेमुळे मूल होत नसेल, तरी तिलाच नाव ठेवले जातात! ‘किती नवरे स्वत: हून असं सांगतात की माझी बायको प्रेग्नंट नाहीऐ तर आम्ही दाम्पत्य प्रेग्नंट आहोत?’ या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारात्मक असल्यामुळे यासारखे दिन आजही साजरे केले जातात.

आता राहिला मुद्दा फेमिनिझमचा. एखाद्याने ऐतिहासिक चित्रपट बनवायचे की मसालापट हा जसा ज्याचा त्याचा विचार आहे तसाच, छोटे कपडे घालायचे की अंगभर कपडे घालायचे हा माझा स्वतंत्र विचार आहे. फेमिनिझम ही संज्ञा स्त्रियांनी छोटे किंवा मोठे कपडे घालावेत या गदारोळात अडकणारी नक्कीच नाही. फेमिनिझम या शब्दाची जी बोळवण केली जाते ती नक्कीच थांबायला हवी. आपल्याला जे हक्क मिळाले आहेत ते कोणी दिलेले नाहीत हे कळलं पाहिजे. पण त्याचबरोबर त्या हक्कांचा सदुपयोग मला करता यायला हवा.
सौजन्य – लोकप्रभा