28 February 2020

News Flash

सुरक्षितपणे गोडधोड खाणं शक्य आहे तर यंदाच्या गणेशोत्सवात उपास का करायचा!

या सगळ्या गोडाधोडाबरोबरच शरीरातल्या साखरेच्या प्रमाणाचा विचार येतो आणि सणाची मजा निरस होते

गणेशोत्सव तोंडावर आला आहे. बाप्पाचा वाढदिवस साजरा करण्याची वेळ आलीय. हा आनंदाचा सण सगळ्यांसाठी सुख-समाधान आणणारा, रोषणाई करून उत्साह वाढवणारा आणि सात्विक समाधान देणार आहे. चवीष्ट मोदकांच्या नुसत्या कल्पनेनं जिभेला पाणी सुटतं आणि कधी एकदा पुरण पोळी, नारळाचे लाडू व हलव्यावर ताव मारतो असं खवय्यांना होतं. पण या सगळ्या गोडाधोडाबरोबरच शरीरातल्या साखरेच्या प्रमाणाचा विचार येतो आणि सणाची मजा निरस होते.

यंदाच्या गणेश चतुर्थीला सणाचं गोडधोड खाऊनही तुमच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहील यासाठी आम्ही मदत करणार आहोत. हा सण सर्वार्थानं तुम्हाला कसा साजरा करता येईल हे वाचा!

काय खाता ते महत्त्वाचं, किती ते नाही!

सगळीकडे चवीष्ट पदार्थांची रेलचेल असताना, मनावर नियंत्रण राखणं अशक्य असतं. परंतु तुमच्या शरीरावर याचा घातक परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. गोड पदार्थ कुठला खायचा याची निवड करा आणि थोड्या थोड्या प्रमाणात ते खा. उदाहरणार्थ, तुम्ही लाडवाच्या ऐवजी उकडीच्या मोदकाची निवड करू शकता. कारण मोदक उकडलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असतं. त्याबरोबरच तुम्ही रात्रीचा आहार हलका घ्या, समजा एक वाटी सूप किंवा वरण फक्त प्यायलात तर संतुलन साधलं जाईल.

पाणी प्या!

शरीरामध्ये द्रव्याचं प्रमाण जास्तीत जास्त ठेवणं आवश्यक असतं. शरीरात साठलेले अनावश्यक घटक शरीराबाहेर काढण्यासाठी पाणी मदत करतं. अनेकदा तर माणसं कंटाळा घालवण्यासाठी खात बसतात. पाणी प्यायल्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल आणि खोट्या भुकेपासून मुक्ती मिळेल. शरीरामधली अतिरिक्त चरबी घालवण्यासाठी दिवसाला तीन ते पाच लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

घरगुती गो़ड पदार्थ सर्वोत्कृष्ट असतात

घरगुती गोड पदार्थांचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला निश्चित माहिती असतं, त्यात कुठले पदार्थ किती वापरले आहेत. तुम्ही साखरेचं प्रमाण मर्यादेत ठेवू शकता आणि बऱ्याचदा तर साखरेऐवजी मधादी आरोग्यदायी पदार्थ वापरून साखर टाळू शकता. गोड पदार्थ बनवताना असे वेगवेगळे प्रयोग करता येणं तुम्हाला शक्य आहे. उदाहरणार्थ, लाडू बनवताना आटवलेल्या दुधाऐवजी तुम्ही घरगुती मावा वापरू शकता. तुम्ही श्रीखंडाचा समावेश जेवणात करू शकता, कारण त्यात तुलनेनं कमी कॅलरी असतात. गोड पदार्थ विकणारी दुकानं कितीही चांगली का असेना, ते पदार्थ कसे बनवतात हे तुम्ही खात्रीशीरपणे नाही सांगू शकत. त्यामुळे घरगुती पदार्थांना पसंती देणं केव्हाही चांगलं. त्यासाठी थोडे कष्ट पडतील पण त्याचा चांगला परिणाम दिसून आला तर ते कष्ट फुकट नाही जाणार. रक्तातल्या साखरेचं प्रमाण नेहमी तपासून घ्या आणि तुमच्या डॉक्टरना ते सांगत जा. म्हणजे मग हे गोड पदार्थ किंवा त्यांचे पर्यायी पदार्थ तुमच्यासाठी आनंददायी ठरतील.

ठराविक अंतरानं रक्तातल्या साखरेचं प्रमाण तपासा

अत्यंत जबाबदारीनं आहार घेणं हे रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात राखण्यासाठी आवश्यक आहे. दुसरा जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे त्यावर लक्ष ठेवणं. यासाठी अत्यंत अचूक व वापरण्यास सोपा असा ग्लुकोमीटर अत्यंत महत्त्वाचा असतो. ग्लुकोमीटर पुरवणारे अनेक ब्रँड आहेत, Accu-Chek Active ग्लुकोमीटर्स हे अद्ययावत असून अचूकतेच्या जागतिक परिणामांच्या (आयएसओ १५१९७) निकषावर उतरणारे आहेत. Accu-Chek Active मीटरच्या सहाय्यानं तुम्ही रक्तातल्या साखरेचं प्रमाण बघू शकाल, साखरेचं प्रमाण कसं कमी जास्त होतं हे समजून घेऊ शकाल आणि डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकाल. आजपासूनच या घटकांवर लक्ष ठेवण्यास सुरूवात करा आणि Accu-Chek Active सहाय्यानं गणेशोत्सवाचा आनंद लुटा.

Accu-Chek ग्लुकोमीटर ऑनलाइन किंवा स्थानिक फार्मसीमधुनही विकत घेता येईल. या उत्पादनासाठी नोंदणी केलीत तर तुम्हाला या उत्पादनावर १० वर्षांची वॉरंटी मिळेल. अॅक्यू-चेक व अन्य उत्पादनांसंदर्भात अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.

त्यामुळे सणाचा मजा घ्या, परंतु जबाबदारीनं घ्याल, याची काळजी घ्या. ज्यावेळी रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात असते त्यावेळी मोदक जास्त चवीष्ट लागतो. आरोग्यदायी गणेश चतुर्थी आपण साजरी करूया. गणपती बाप्पा मोरया!

(प्रायोजित)

First Published on September 14, 2018 1:14 pm

Web Title: why fast when you can feast safely this ganesh chaturthi
Next Stories
1 अर्थ-चिंतेवर उतारा!
2 ‘भारतीय अर्थव्यवस्था जागतिक हादरे पचविण्यासाठी सक्षम’
3 औद्योगिक उत्पादन दरात ६.६ टक्क्य़ांची उत्साहवर्धक उभारी
Just Now!
X