News Flash

दिन-दिन दिवाळी । गाई-म्हशी ओवाळी ।

दिवाळीच्या सणाला सुरूवात होते ती वसुबारसने

गाय आणि वासरु यांची पूजा करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस.

दिवाळीच्या सणाला सुरूवात होते ती वसुबारसने. त्यामुळे आजपासून दिवाळीला सुरूवात झाली आहे. हा सण ‘गोवत्स द्वादशी’  म्हणूनही ओळखला जातो. गाय आणि वासरु यांची पूजा करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस. या दिवशी दुधदुभत्या जनावरांची, बैलांची बळीराजा पूजा करतो. त्याला गोडा धोडाचा नैवैद्य खाऊ घातलो. ज्याच्या मेहनतीने मातीत धान्य पिकते त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. या दिवशी गावाकडे गोठे स्वच्छ करून सजवले जातात. काही ठिकाणी या दिवशी शेतात शेणाच्या गवळणी आणि श्रीकृष्णाची मुर्ती ठेवण्याचीही प्रथा आहे. कुंकू, फुले वाहून गाय वासराची पूजा केली जाते. त्यांना गोड नैवैद्य खायला दिला जातो. भारतीय संस्कृतीत पशूधनाची पूजा करण्याची परंपरा आहे. हजारो वर्षांपासून अन्न असो किंवा इतर कामे माणूस हा तितकाच पशूंवर देखील अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारताच्या विविध राज्यात सण साजरे केले जातात. कुठे नागपंचमी, कुठे बैलपोळा. दिवाळीच्या सणाची सुरूवात देखील गोधनाची पूजा करून होते. यंदा सहा सव्वासहाच्या दरम्यान सूर्यास्त आहे त्यामुळे वासुबारसाचा मुहूर्त हा जवळपास साडेपाच पावणे सहाच्या आसपास असणार आहे.

अशी केली जाते वासुबारस पूजा – दूधदूभत्या जनावरांची गंध, कुंकूम, अक्षता वाहून पूजा केली जाते. सुगंधी फुलांचा हार घालून गायीला अर्घ्य दिले दाते. तांब्याच्या कलशातले ताज्या पाण्याचे अर्घ्य वासराच्याच्या पायांवर सोडले जाते. त्यानंतर पुरणपोळी किंवा गोडाचा नैवैद्य त्यांना दिला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 11:16 am

Web Title: why we celebrate vasubaras
Next Stories
1 कंपवात रुग्णांसाठी स्मार्ट ग्लोव्हज
2 Dhanteras 2016 : जाणून घ्या का साजरी केली जाते धनत्रयोदशी!
3 गर्भाशयाच्या कर्करुग्णांना कांदा उपयुक्त
Just Now!
X