वर्ष संपत आले की प्रत्येकाच्या मनात कर नियोजनाचा विचार येतो. वर्षभर निवांत असलले आपण मार्च महिना जवळ आला की आपण कराचा विचार करायला लागतो. मग आपल्या कष्टाच्या पैशांची बचत करण्यासाठी वर्षाखेरीचीच वाट कशाला पहायला हवी? अखेरच्या क्षणांमध्ये घाई घाईत निर्णय घेतले जातात. तुम्ही बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या उत्पादनांचे संशोधन आणि तुलना करण्यासाठी वेळ हातात असताना अधिक प्रभावीपणे आणि सुजाणपणे कराची बचत करणा-या गुंतवणूकी करु शकता. तुम्ही वर्षाखेरीच्या/वार्षिक बोनसचा देखील वर्षाच्या या काळात उपयोग करु शकता. २०१८-१९वर्षाचे अखेरचे त्रैमासिक आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे आणि जर तुम्ही अजूनही तुमचे कर नियोजन संपवले नसेल तर ते करण्याची हीच योग्य वेळ आहे असे म्हणायला हरकत नाही. तुमच्या जोखीम घेण्याच्या प्रवृत्तीचा, परताव्याच्या गरजेचा आढावा घ्या आणि योग्य निर्णय घेण्यासाठी तुमच्या कर बचत गुंतवणूकीच्या पर्यायांचा विचार करा…

कुठे गुंतवणूक कराल?

लवकर सुरुवात करण्यामधली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या कर बचत गुंतवणूकीला हप्त्यांमध्ये विभागू शकता आणि रोखीची चणचण टाळू शकता. हप्त्यांमध्ये गुंतवणूक करण्यामुळे तुम्हाला बाजारपेठेतील अस्थिरतेची सरासरी काढण्यात मदत होते. तुमच्या जोखीम घेण्याच्या प्रवृत्तीवर तसेच परताव्याच्या अपेक्षांवर आधारुन, तुम्ही इक्विटी आणि डेब्ट दृष्टीकोन असलेल्या कर बचत साधनांची निवड करु शकता.

इएलएसएस: तुम्ही इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्किम्स (इएलएसएस)च्या मार्फत पुरेशा प्रमाणात, दीर्घकाळासाठी परतावा कमवू शकता. तुम्ही एकत्रित रक्कम गुंतवण्याचा किंवा एसआयपी माध्यमांचा विकल्प निवडू शकता. इएलएसएस तीन वर्षाच्या लॉक इन कालावधीसोबत येते आणि तुम्हाला कलम ८०(सी) अंतर्गत १.५ लाख रुपयांच्या कर कपातीचा लाभ देते.

युलिप: युनिट लिंक्ड इन्श्युरन्स प्लॅन (युलिप) तुम्हाला दोन्ही कर लाभ आणि इक्विटी बाजारपेठेतील गुंतवणूकीमधून परतावा देतो. युलिपचा लॉक इन कालावधी पाच वर्षांचा असतो.

इतर विकल्प: जर तुम्ही कमी जोखमीच्या कर बचत योजना पाहत असाल तर सुकन्या समृध्दी योजना (जर तुमची मुलगी असेल तर), पीपीएफ, एनएससी इ.चा विचार करायला हरकत नाही. ज्यामुळे कलम ८०सीच्या अंतर्गत कर कपातीसाठी पात्र होता येऊ शकते.

एनपीएस: ही निवृत्तीवर लक्ष केंद्रित करणारी गुंतवणूक योजना आहे आणि ती तुम्हाला कलम ८० (सीसीडी) अन्वये ५००००रुपयांच्या अतिरिक्त कपात लाभाला मिळवण्याची मुभा देते, हा लाभ कलम ८०(सी)च्या अन्वये दिलेल्या मर्यादेच्या वर आहे. परिपक्वता कॉर्पस देखील ४०% पर्यंत करमुक्त आहे. अखेरची पण शेवटची नसलेली बाब म्हणजे तुम्ही कर बचतीला एका वेळची घटना समजण्याऐवजी एक निरंतर प्रक्रिया म्हणून विचारात घ्यायला हवे

आदिल शेट्टी

सीइओ, बॅंकबझार