News Flash

मक्याचे कणीस खाल्ल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी; कारण…

आरोग्यावर होऊ शकतात हे परिणाम..

संग्रहित छायाचित्र

रिमझिम पाऊस.. मातीचा सुगंध.. अधूनमधून वाहणारे वारे आणि अशा अशा वातावरणात खरपूस भाजलेल्या मक्याच्या कणसावर लिंबू, तिखट मसाला पेरून खाण्याची मजा काही औरच! मक्याचे कणीस खाण्याचे बरेच आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत. मात्र योग्य पद्धतीने मका न खाल्ल्यास शरीराला त्याचे तोटेही आहेत. मक्याचे कणीस खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. त्यामागची कारणं आणि नेमकं पाणी कधी प्यावं हे जाणून घ्या.

पचनसंस्थेवर होतो परिणाम

मक्याचे कणीस खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पचनसंस्थेवर परिणाम होतो. मग ते तुम्ही भाजून खात असाल किंवा मग उकडून. त्यावर लगेच पाणी पिऊ नका. मक्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. ते खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्यास पचनक्रियेवर परिणाम होतो. पाण्यामुळे फायबर पचण्यासाठी वेळ लागतो आणि त्यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो.

गॅसची समस्या

मक्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि स्टार्च अधिक प्रमाणात असते. हे घटक पाण्याशी मिसळताच गॅस निर्माण करतात. यामुळे मका खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटात गॅस होऊ शकतो. परिणामी अॅसिडिटी, पोट फुगणे अशा समस्या सतावू लागतात.

कधी पाणी प्यावे?

मक्याचे कणीस खाण्याआधी भरपूर पाणी पिऊ नका आणि खाल्ल्यानंतर पण लगेच पिऊ नका. मक्याचे कणीस खाल्ल्यानंतर ४५ मिनिटांनी पाणी प्या. तसेच मक्याचे कणीस खाण्याआधी अर्धा तास पाणी प्या. त्यामुळे आरोग्याला कोणतेही नुकसान होणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 1:09 pm

Web Title: why you should not drink water after eating bhutta ssv 92
Next Stories
1 आयफोनच्या ‘सफारी’साठी गुगल मोजते तब्बल इतके पैसे, आकडा वाचून व्हाल थक्क
2 TikTok ला भारतीय पर्याय असलेल्या ‘चिंगारी’ची वेबसाइट हॅक? युजर्सचा डेटा सेफ असल्याची कंपनीची माहिती
3 OnePlus 8 Pro चा पुन्हा ‘सेल’, Jio युजर्सना मिळेल ₹6000 पर्यंतचा फायदा
Just Now!
X