जसा पृथ्वीचा सर्वाधिक भाग पाण्याने व्यापला आहे. तसाच शरीरातील बहुतांश भागही पाण्यानेच व्यापला आहे. पाण्यामुळे शरीरातील सर्व क्रिया सुरळीत चालू असतात. शरीराची सफाई करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. आपण दिवसभरात जितके पाणी पिऊ तितके चांगलेच असते.सामान्यपणे प्रत्येकाने दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. मात्र हे पाणी कसे आणि दिवसातील कोणत्या वेळेस प्यावे हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.

बऱ्याच वेळा आपण जेवण झालं की लगेच पाणी पितो. मात्र जेवण झाल्यावर लगेच पाणी पिणे शरीरासाठी अपायकारक आहे. त्यामुळे जेवण झालं की लगेच कधीच पाणी पिऊ नये. अर्ध्या तासानंतर पाणी प्यावे किंवा कोमट पाणी प्यावे.

१. जेवण झाल्यावर लगेच पाणी प्यायले तर जठराग्नि समाप्त होते.

२. अन्नाचं नीट पचन होत नाही.

३. मोठ्या प्रमाणात गॅस आणि अॅसिडी निर्माण होतो.

४. अन्नामध्ये प्रोटीन आणि अन्य घटकांचा मोठा समावेश असतो. मात्र जेवण झाल्यानंतर लगेच त्याचं पचन झालेलं नसतं त्यातच जर पाणी प्यायलो तर पोट दुखीसारखी तक्रार उद्भवू शकते.

पाणी कधी प्यावे?

१. सकाळी झोपेतून उठल्यावर किमान एक ग्लास कोमट पाणी प्यावे. त्यामुळे शरीर चांगल्या पद्धतीने साफ होण्यास फॅटस कमी होण्यास मदत होते.

२. पाणी उभे राहून पिणे चांगले नाही. बसून प्यावे.

३. एकाचवेळी खूप पाणी पिऊ नये. दर थोडा वेळाने दोन ते तीन घोट पाणी प्यावे.

४. आंघोळ झाल्यावर दररोज १ ग्लास पाणी प्यावे. आंघोळीने काही वेळा थकल्यासारखे होते. तसेच ब्लडप्रेशरची तक्रार उद्भवत नाही.

आणखी वाचा – कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मेथीचे दाणे आहेत गुणकारी

५. जेवणानंतर लगेच पाणी न पिता जेवणाआधी अर्धा तास पाणी प्यावे. यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय जेवणानंतर अर्धा ते पाऊण तासाने पाणी प्यावे .

६. झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने हृदयरोगापासून सुटका मिळू शकते. त्यामुळे दररोज झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यावे.