टेक कंपनी Gionee ने अलिकडेच Gionee Max Pro हा आपला लेटेस्ट आपला लेटेस्ट स्मार्टफोन भारतात लाँच केला. या डिव्हाइसमध्ये मोठ्या स्क्रीनसह तब्बल 6,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय फोनमध्ये एकूण तीन कॅमेरे आणि फेस अनलॉकसारखे शानदार फिचर्सही आहेत. सविस्तर जाणून घेऊया या फोनचे स्पेसिफिकेशन्स

Gionee Max Pro चे स्पेसिफिकेशन्स :-
Gionee Max Pro स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. तसेच, यात Spreadtrum 9863A प्रोसेसर, 3GB रॅम आणि 32GB की इंटर्नल स्टोरेज मिळेल. माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येणंही शक्य आहे. याशिवाय तब्बल 6,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी फोनमध्ये देण्यात आली आहे. या बॅटरीमुळे 34 दिवसांचा स्टँडबाय, 115 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक, 60 तासांपर्यंत कॉलिंग, 13 तासांपर्यंत सिनेमा आणि 12 तासांपर्यंत गेमिंग बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे. कंपनीने Gionee Max Pro मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला असूवन यातील पहिला 13MP प्रायमरी सेन्सर आणि दुसरा 2 मेगापिक्सेल क्षमतेचा कॅमेरा मिळेल. तसेच, सेल्फीसाठी फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेराही आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, जीपीएस आणि युएसबी पोर्ट यांसारखे कनेक्टिव्हिटी फिचर्स मिळतील.

Gionee Max Pro ची किंमत :-
Gionee Max Pro स्मार्टफोनची किंमत 6 हजार 999 रुपये आहे. 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज असलेला हा फोन ब्लॅक, ब्लू आणि रेड अशा तीन रंगांच्या पर्यायात खरेदी करता येईल. तर, 8 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपासून ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर या फोनसाठी पहिला सेल सुरू होणार आहे.