सॅमसंग कंपनीने फेब्रुवारीमध्ये भारतात तब्बल 7,000mAh बॅटरी क्षमता असलेला अजून एक स्मार्टफोन लाँच केला. कंपनीने Samsung Galaxy F62 हा नवीन मिडरेंज स्मार्टफोन आणलाय. जर तुम्हीही 7000 mAh बॅटरी क्षमता आणि दमदार फिचर्स असलेला हा फोन खरेदी करायचा विचार करत असाल तर स्वस्तात हा फोन कसा खरेदी करता येईल याबाबत आम्ही माहिती देणार आहोत. सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy F62 ची किंमत :-
Samsung Galaxy F62 ची बेसिक किंमत 23 हजार 999 रुपये आहे. ही किंमत 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची आहे. तर, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी मॉडेलची किंमत 25 हजार 999 रुपये आहे. हा फोन लेजर ब्लू, लेजर ग्रीन आणि लेजर ग्रे अशा तीन कलर्समध्ये उपलब्ध असेल. Samsung Galaxy F62 मध्ये पंचहोल डिस्प्ले आहे. याशिवाय क्वॉड कॅमेरा सेटअप असून Exynos 9825 प्रोसेसर दिलं आहे. हे एक ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. सॅमसंगच्या या फोनची टक्कर OnePlus Nord, Realme X3 SuperZoom आणि Realme X7 5G यांसारख्या स्मार्टफोनसोबत असेल. यापूर्वीही कंपनीने 7,000mAh बॅटरी असलेला Galaxy M51 आणला होता.

फ्लिपकार्ट ऑफर :- 
Galaxy F62 हा फोन फ्लिपकार्टवर अनेक आकर्षक ऑफर्ससह विक्रीसाठी उपलब्ध आहे. ICICI बँकेच्या खातेधारकांना या फोनच्या खरेदीवर अडीच हजार रुपये सवलत मिळू शकते. कारण, ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा ईएमआय व्यवहाराद्वारे हा फोन खरेदी केल्यास 2,500 रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. याशिवाय फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यासही 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. तसेच दरमहा 4000 रुपये दरमहा नो-कॉस्ट ईएमआय आणि स्टँडर्ड ईएमआयचा पर्यायही आहे.

Samsung Galaxy F62 स्पेसिफिकेशन्स :-
फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्टसोबत अँड्रॉइड 11 आधारित One UI 3.1 आहे. फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अॅमोलेड डिस्प्ले आहे. याशिवाय फोनमध्ये ऑक्टाकोर Exynos 9825 प्रोसेसरही आहे. 8 जीबीपर्यंत रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनचं स्टोरेज मेमरी कार्डच्या मदतीने 1 टीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे.

Samsung Galaxy F62 कॅमेरा :-
फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप अर्थात मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. त्यातील 64 मेगापिक्सलचा सोनी IMX682 सेन्सर मुख्य कॅमेरा आहे, तर दुसरा 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल, तिसरा 5 मेगापिक्सेल मॅक्रो आणि चौथा 5 मेगापिक्सेलचा डेफ्थ सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे. रिअर आणि फ्रंट दोन्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते.

Samsung Galaxy F62 बॅटरी :-
फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, ब्लूटूथ v5.0, GPS/A-GPS, NFC, USB टाइप-सी पोर्ट आणि 3.5एमएम हेडफोन जॅक मिळेल. फोनमध्ये साइड माउंटेड पॉवर बटणमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आहे. याशिवाय यामध्ये 25W फास्ट चार्जिंगसोबतच रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट असलेली 7000mAh क्षमतेची बॅटरी आहे.

आणखी वाचा- स्वस्त झाला Samsung चा ‘बजेट’ स्मार्टफोन, मिळेल ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप + 5000mAh बॅटरी