News Flash

साखरविरहित पेय दातांसाठी त्रासदायक

गोड खाल्ल्याने दात खराब होतात, असा अनेकांचा गैरसमज असतो

| December 7, 2015 05:20 am

ऑस्ट्रेलियातील संशोधकांचे मत

गोड खाल्ल्याने दात खराब होतात, असा अनेकांचा गैरसमज असतो. त्यामुळे दातांच्या सुरक्षेसाठी अनेक जण साखरविरहित पेय प्राशन करतात. पण साखरविरहित पेय घेतल्याने आपले दात सुरक्षित झाले आहेत, असे वाटत असेल तर सावध व्हा आणि पुन्हा विचार करा. कारण साखरविरहित पेय दातांसाठी त्रासदायक असल्याचे नुकतेच एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा पेयांपासून दूर राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. मेलबर्न विद्यापीठातील ‘ओरल हेल्थ को-ऑपरेटिव्ह रिसर्च सेंटर’च्या संशोधकांनी यासंबंधी २३ वेगवेगळ्या पेयांचा अभ्यास केला. यामध्ये साखरविरहित पेयांमध्ये दातांना हानिकारक ठरणारे घटक आढळले आहेत. या विभागाचे प्रमुख संशोधक इरिक रेनॉल्ड्स म्हणाले की, साखरेचे प्रमाण कमी केल्यामुळे दातांचा त्रास कमी होईल, असा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र, अशा पदार्थामध्ये किंवा पेयांमध्ये दातांना हानिकारक ठरतील, असे रासायनिक घटकही असतात, याचा विचार केला जात नाही.
काही पदार्थामधील रासायनिक घटकांमुळे दातांवर पिवळ्या रंगाचा मुलामा निर्माण होतो आणि त्यामुळे दातांमध्ये कीड लागण्यास सुरुवात होते, असेही रेनॉल्ड्स यांनी सांगितले. कीड लागल्यावर दातांची कीड काढून ते स्वच्छ करावे लागतात आणि नंतर त्याच्यावर पुनर्भरण प्रक्रिया केली जाते. किंवा दात काढून टाकण्याचा धोकाही असतो. साखरविरहित पेयांमुळे दातांच्या पृष्ठभागाचे नुकसान होते, असे संशोधकांनी सांगितले. शीतपेय आणि क्रीडा क्षेत्रातील पेयांमुळेही दातांच्या पृष्ठभागाचे ३०-५० टक्के नुकसान होते. साखरयुक्त आणि साखरविरहित अशा दोन्ही प्रकारच्या पेयांमुळे दातांच्या पृष्ठभागाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे साखरविरहित पेयांमुळे दातांचे नुकसान होणार नाही, अशा भ्रमात राहू नये, असेही संशोधकांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2015 5:20 am

Web Title: without sugar drink dangerous for health
Next Stories
1 फ्रेंच फ्राइज आरोग्यासाठी धोकादायक
2 जगभरातील साडेसात टक्के कर्करोगग्रस्त भारतीय
3 स्निग्ध पदार्थाचे अतिसेवन मेंदूसाठी घातक
Just Now!
X