News Flash

मुलींना आवडतात या सहा गोष्टी, पण व्यक्त करत नाहीत!

आपल्या जोडीदाराविषयी मुलींच्या मनात काही सुप्त अपेक्षा असतात.

प्रेमात पडणे एक गोष्ट आहे आणि प्रेमातले सातत्य टिकवणे ही दुसरी. सुरूवातीला अखंड प्रेमात बुडालेली युगुलं नंतरच्या काळात एकमेकांविषयी तक्रारीचा सूर आळवताना अनेकदा पाहायला मिळतात. प्रेमातील सातत्य टिकवण्यासाठी समर्पणाची आणि एकमेकांना समजून घेण्याची आवश्यकता असते. अनेकवेळा नकळतपणे जोडीदार दुखावल्याने नातेसंबंधात अंतर पडण्यास सुरुवात होते. यासाठी जोडीदाराच्या भावनांची कदर करणे, एकमेकांचे विचार समजून घेणे अशा काही गोष्टींची काळजी घेतल्यास एकमेकांमधील नातेसंबंध अधिक घट्ट होण्यास मदत होऊ शकते. आपल्या जोडीदाराविषयी मुलींच्या मनात काही सुप्त अपेक्षा असतात, जाणून घेऊया अशा सहा गोष्टी ज्याविषयी मुली मोकळेपणाने जोडीदाराकडे व्यक्त होत नाहीत.

१. काळजी घेणारा जोडीदार मुलींना आवडतो – भले मुली जोडीदारासमोर आपण कणखर असल्याचे भासवत असतील. परंतु, आपल्या जोडीदाराने आपली काळजी घ्यावी, असा विचार त्या आतल्याआत करत असतात. तिच्या काळजीपोटी तुम्ही केलेला एखादा कॉल अथवा मेसेज तिला याची अनुभूती देतो. एखाद्याची काळजी घेणे चांगलेच, परंतु हे करत असताना आपण ‘पझेसिव्ह’ तर होत नाही ना याची दखल घेणे हेसुध्दा महत्त्वाचे आहे.

२. भूतकाळावर चर्चा करणे – सर्वांच्या आयुष्यात भूतकाळ असतो. काही छुप्या गोष्टी असतात. मुली या गोष्टींवरदेखील पूर्ण लक्ष देऊन असतात. जोडीदाराच्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट जाणून घेण्यात मुलींना रस असतो. अशावेळी तिला विश्वासात घेऊन चर्चा करणे फायद्याचे ठरू शकते. कारण तिच्यावर तुमचा असलेला विश्वास तुम्ही तिच्या बरोबर असल्याची तिला खात्री देतो.

३. सल्ला थोपवू नका – आपले म्हणणे पूर्णपणे ऐकून मगच जोडीदाराने प्रतिक्रिया द्यावी, अशी मुलींची इच्छा असते. अर्धवट ऐकून सल्ला दिल्यास ते योग्य ठरणार नाही. कारण जोडीदाराचे असे वागणे मुलींना सहन होत नाही. तुमच्याकडे काही उपाय असेल, तर जरुर सूचवावा. परंतु, नीट ऐकून न घेता सल्ला देण्याची चूक करू नका.

४. रोमान्स हरवणे – सुरुवातीला अखंड प्रेमात असलेले कालांतराने आपल्या जोडीदाराला दुर्लक्षित करण्यास सुरुवात करतात. परिणामी दोघांमधला प्रेमाचा नाजूक धागा हळूहळू तुटू लागतो. व्यव्स्थित सुरू असलेल्या गोष्टी तुम्ही कंटाळवाण्या करण्यास सुरुवात करता. यातून वाचण्यासाठी जीवनात रोमान्सचा तडका कायम ठेवणे गरजेचे आहे. वेळोवेळी चांगल्या योजना आखून जोडीदाराला सरप्राइज करत रहा.

५. कमतरता जाणून घेणे – मुलींना केवळ कौतुक केलेलेच आवडते असे मुळीच नाही. त्यावर आपल्यातील कमतरता जाणून घ्यायलादेखील त्यांना आवडते. जेव्हा तुम्ही याबाबत जोडीदाराशी बोलता तेव्हा तिचे कोणते वागणे तुम्हाला त्रास देते याविषयी तिला समजते आणि त्यात बदल करण्याचा प्रयत्नदेखील ती करू शकते. पण हे करत असताना तुम्ही थोडी सावधानता बाळगत विचारपूर्वक कृती करणे गरजेचे आहे.

६. गंध – पुरुषांच्या शरीराचा गंध स्त्रियांना आवडत असल्याची माहिती याबाबतच्या एका पाहणीतून समोर आली आहे. यामुळे त्यांच्या मनात आराम मिळाल्याची भावना निर्माण होते. काही खास प्रसंगी जोडीदाराला मिठी मारून तिचे स्वागत कराल तर खचितच ते तिला सुखावणारे असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2016 4:02 pm

Web Title: women always want these things but never tell their partner
Next Stories
1 फॅशनबाजार : क्रेझी तरुणाईचा लावण्यालंकार – भिकबाळी
2 बालकांमधील कर्करोगाबद्दल जनजागृतीची मोहीम
3 ‘ग्रीन टी’मुळे धमन्यांचे कार्य सुरळीत
Just Now!
X