News Flash

महिलांमध्ये कर्करोग होण्याची ‘ही’ आहेत कारणं, ‘या’ लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष

आपल्या आरोग्याची घ्या काळजी

डॉ. माधुरी बुरांडे लाहा

सध्याच्या काळात कर्करोगग्रस्तांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळतं. खरं तर नागरिकांमध्ये कर्करोग होण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठं कारण म्हणजे बदलती जीवनशैली आणि आहाराची चुकीची पद्धत. अनेकदा आपल्याला लहान-लहान शारीरिक व्याधी त्रास देत असतात. मात्र, त्याकडे आपण बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो. परंतु. या दुर्लक्ष करण्याच्याच सवयीमुळे पुढे जाऊन हेच आजार रौद्ररुप धारण करतात. यात बऱ्याच स्त्रीया त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच स्त्रीयामध्ये कर्करोगांच प्रमाण जास्त असल्याचं पाहायला मिळतं. म्हणूनच कर्करोगापासून दूर रहायचं असेल तर स्त्रीयांनी त्यांच्या आहारात काही महत्त्वाचे बदल करणं गरजेचं आहे.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

१. ओटीपोटात होणा-या वेदना –

गर्भाशयाचा कर्करोग असणा-या रुग्णांमध्ये ओटीपोटात दुखणं, पाठदुखी होणं अशा समस्या वारंवार निर्माण होतात. त्याचप्रमाणे, पोटात गोळा येणे हे गर्भाशय ग्रीवेच्या कर्करोगाचे लक्षण आहे. अधिक काळ त्याच ठिकाणी वेदना होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

२.रक्तस्त्राव –

लैंगिक संबंधांनंतर जर रक्तस्त्राव होत असेल तर वेळीच डॉक्टरांशी संवाद साधला पाहिजे. कारण असा रक्तस्त्राव होत असल्यास गर्भाशयाचा किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असण्याची शक्यता असते.

३. अचानक वजन कमी होणे –

आपण आपला आहार किंवा व्यायामाची पद्धत बदलली नसतानाही अचानक वजन कमी झाले की आपण त्याबद्दल सावध असले पाहिजे. अशा प्रकारे वजन कमी होणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

४. अतिसार किंवा बद्धकोष्ठता-

आपल्या आतड्यांमधील आणि मूत्राशयाच्या सवयींमध्ये बदल झाला आहे? आपल्याला बद्धकोष्ठता, अतिसार किंवा वारंवार लघवी होणे ही लक्षणे दिसतात का? त्यानंतर, त्यांची नोंद घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

५. खाण्याच्या सवयींमध्ये बदल-

जर तुमचे पोट लगेचच भरल्यासारखे वाटते किंवा तुम्हाला खाण्याची इच्छा होत नसेल तर ते गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

६. जर तुमच्या जननेंद्रियाच्या रंगात किंवा त्वचेत होणारे बदल ( पुरळ, फोड, अल्सर) ही दिसून आल्यास त्वरीत त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

(लेखक डॉ. माधुरी बुरांडे लाहा या खराडी, पुणे येथील मदरहुड हॉस्पीटलमध्ये सल्लागार, प्रसुति व स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 5:55 pm

Web Title: women health how to identify uterine cancer ssj 93
Next Stories
1 खराब झालेली अंडी घरच्या घरी कशी ओळखायची माहिती नाही? मग हे वाचा
2 ३१ ऑक्टोबरला Blue Moon चा योग; जाणून घ्या नक्की कधी आणि कसा पाहता येणार
3 दसऱ्याला मागणी दिवाळीत धमाका
Just Now!
X