News Flash

पुरुषी वर्चस्वामुळे महिलांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम

या महिलांना सामाजिक तणावाचा सर्वाधिक सामना करावा लागतो

पुरुषांची संख्या अधिक असलेल्या कंपन्यांमध्ये काम करणाऱया महिलांना ताणतणावाचा सामना करावा लागतो आणि त्याचा त्यांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होतो, असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. या महिलांना सामाजिक तणावाचा सर्वाधिक सामना करावा लागतो, असेही संशोधनात आढळले.
याबद्दल समाजशास्त्रात पीएचडी करणाऱया बिआंका मनागो म्हणाल्या, महिलांना कामाच्या ठिकाणी किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी तणावाचा सामना करावा लागण्याची शक्यता अधिक असते. यामुळे काही महिलांना सामाजिक बहिष्कृतपणाचा, लैंगिक शोषण, सहकार्यांच्या संशयी वृत्तीचा आणि कार्यक्षमता टिकवण्याचा सामना करावा लागतो. अशावेळी कामाच्या ठिकाणी महिलांना सामाजिक दृष्टीने आवश्यक ती मदतही अनेकवेळा उपलब्ध होत नाही.
पुरुषांची संख्या ८५ टक्केपेक्षा जास्त असणाऱया कंपनीमध्ये काम करणाऱया महिलांच्या हार्मोन्समध्ये होणाऱया बदलांचा मनागो आणि त्यांच्या सहकाऱयांनी अभ्याक केला. त्यावरून त्यांनी वरील निष्कर्ष काढले आहेत. अमेरिकेतील शिकागोमध्ये झालेल्या समाजशास्त्र अभ्यासकांच्या बैठकीमध्ये या संशोधनाबद्दल माहिती देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 7:22 pm

Web Title: women in male dominated offices undergo high stress
टॅग : Lifestyle,Men
Next Stories
1 कारिंद्याची खीर
2 टोमॅटो राइस
3 पॉर्न साईट्समुळे दाम्पत्यांमधील संबंधांवर विपरित परिणाम
Just Now!
X