News Flash

वजन कमी करण्यासाठी महिलांना अधिक श्रम

वजन कमी करण्यासाठी पुरुषांपेक्षा महिलांना जास्त श्रम घ्यावे लागतात.

| February 7, 2016 01:49 am

वजन कमी करण्यासाठी पुरुषांपेक्षा महिलांना जास्त श्रम घ्यावे लागतात. यासाठी दोघांच्या मेंदूची असलेली वेगवेगळी ठेवण कारणीभूत असल्याचे नव्या संशोधनातून समोर आले आहे. वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण मिळवणे हे अनेकांना उंच पर्वतावर चढण्यासारखे कठीण वाटते. पण यूकेतील अबेरदीन विद्यापीठातील संशोधकांच्या म्हणण्यानुसार हे लक्ष्य साध्य करणे इतरांपेक्षा महिलांना जास्त कठीण आहे. यासाठी संशोधकांनी उंदरांच्या प्रजातीवर विविध परीक्षणे नोंदवताना वजन कमी करण्यासाठी मादी आणि नर यांच्यातील कोणत्या सवयी आणि खर्च होणारी ऊर्जा यांच्यातील फरक नोंदवून घेतला. या वेळी संशोधनादरम्यान भूक आणि कमी शारीरिक हालचालीमुळे लठ्ठ नर उंदराचे परिवर्तन हे सडपातळ आणि निरोगी उंदरांमध्ये झाल्याचे आढळून आले. पण अशाच स्वरूपाचा बदल उंदरांच्या मादीत मात्र दिसून आला नाही.
लिंगअनुरूप होणारे हे संशोधन भविष्यात परिणामकारक ठरणार असून यामुळे पसरलेल्या लठ्ठपणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवणे सहज शक्य होणार आहे. केंब्रिज आणि मिशिगन विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या संशोधनातील एक संशोधक आणि अबेरदीन विद्यापीठाच्या लोरा हेसलेर यांच्या मते, जागतिक आरोग्य संस्थेनुसार (डब्लूएचओ) लठ्ठपणाची समस्या असलेल्या महिलांची संख्खा विश्वभरात वाढत असून अन्य भागांतील काही पुरुषांवरदेखील त्याचा प्रभाव वाढत आहे. त्यासाठी पुरुष आणि स्त्री यांच्या मेंदूतील विशिष्ट भाग कारणीभूत आहे, जो अन्नातील विविध घटकांचा वापर ऊर्जेसाठी करीत असतो. मेंदूतील हीच संप्रेरके अतिशय महत्त्वाची असून त्यांना प्रो-ओपिमेलानोकोर्टिन(पीओएमसी) पेप्टाइड्सना असेही संबोधण्यात येते. जे शरीरातील लठ्ठपणा, शारीरिक कसरती, ऊर्जेचे विकेंद्रीकरण आणि वजन याच्याशी निगडित असल्याचा संशोधकांचा दावा आहे. पण उंदरांच्या मादीत मात्र पीओएमसी पेप्टाइड्समुळे कोणत्याही प्रकारचे शारीरिक बदल आणि ऊर्जेचे विकेंद्रीकरण होत नसल्याचे मत हेसलेर यांनी व्यक्त केले. त्यामुळे जर औषधांचा वापर करून महिलांमधील पीओएमसी पेप्टाइड्सना लक्ष्य करण्यात आले तर लठ्ठपणाची समस्या दूर होऊ शकते. संशोधनातूनदेखील हेच सिद्ध झाले की, यामुळे शारीरिक कसरती आणि ऊर्जेच्या विकेंद्रीकरणाबाबत मेंदूला कोणत्याही प्रकारची चालना मिळत नाही. हेसलेर यांच्या मते, संशोधनात लिंग-फरक असल्यास मेंदूतील विशिष्ट पीओएमसी पेप्टाइड्सचे कार्यदेखील शारीरिक कसरती, ऊर्जेचे विकेंद्रीकरण आणि वजन याविषयी बदलत असल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन ‘मोलेकुलर मेटाबोलिजम’ या जनरलमधून प्रसिद्ध झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 1:49 am

Web Title: women should more effort to reduce weight
Next Stories
1 फॅशनबाजार : केशभूषणांचा राजेशाही थाट..
2 आग्नेय आशियात प्रदूषणामुळेच कर्करोगात वाढ
3 सिगारेटची देवाण-घेवाण हानिकारक!
Just Now!
X