कार्यालयीन कामाची वेळ ८ तासांची असेल आणि त्याहीपेक्षा जास्त तास काम करणा-यांना हृदयरोगाचा सर्वात जास्त धोका आहे. हे ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून समोर आल आहे.
आठ तासांच्या ठराविक मर्यादेपेक्षा सर्वात जास्त वेळ काम करणाऱ्यांमध्ये हृदयरोगाचा धोका ४० ते ८० टक्क्यांनी वाढतो. संशोधकांनी यासाठी जगभरातील २२ हजार नोकरशहांच्या आरोग्याचे परीक्षण केले. त्यांच्या मते डॉक्टरांना आता आपल्या रूग्णांना हे विचारण्याची गरज आहे, की ते किती तास काम करतात.
यातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. मरिआन्ना विर्तनेन म्हणाल्या की, या संशोधनानुसार आपण किती तास काम करतात हे रूग्णांना विचारणे हा डॉक्टरांच्या निदान किंवा चौकशीतला महत्वाचा मुद्दा झाला पाहिजे. ही नवी माहिती हृदयरोगसाठी देण्यात येणाऱ्या औषधींच्या निर्णयातही सुधारणा आणणार आहे. ज्या लोकांना दुसऱ्या आजाराचे लक्षण आहेत आणि ते जास्त वेळ काम करतात त्यांच्यासाठी हा इशारा आहे.
या शोधात ११ वर्षापासून भाग घेणाऱ्या १९२ लोकांना हृदयविकाराचा झटका आला आहे. जे आठ तासांपेक्षा जास्त काम करतात. कमी तास काम करणा-यांना जास्त या लोकांच्या तुलनेत हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण कमी आहे.