01 March 2021

News Flash

World Asthama Day 2018 : अस्थमाचा त्रास कमी होण्यासाठी ही आसने उपयुक्त

अस्थमातून आराम मिळवायचा असल्यास तसेच हा त्रास मूळातून नष्ट करायचा असेल तर योग हा उत्तम उपाय आहे.

दम्याचा त्रास असणाऱ्यांनी थंडी, पाऊस किंवा धूळीमध्ये विशेष काळजी घेणे आवश्यक असते. अॅंटीबायोटीक्स किंवा इनहेलरने या व्यक्तींचा त्रास काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकतो. मात्र एकाएकी हा त्रास कधी कसा उद्भवेल सांगता येत नाही. तसेच औषधांनी आणि इनहेलरने तात्पुरता आराम मिळतो मात्र हा त्रास मूळातून नष्ट करायचा असेल तर योग केल्यावर हा त्रास कमी होण्यास मदत होते. पाहूयात दिर्घकाळ दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींसाठी उपयुक्त आसने…

भुजंगासन

हे आसन करायला सोपे असून त्यामुळे चरबी घटण्यास मदत होते. सुरुवातीला पालथे झोपावे, हात कंबरेजवळ आणून कंबरेतून वर मागच्या दिशेला वळावे. यावेळी पाय एकमेकाला जोडलेले असावेत. या आसनामध्ये पोटाचे स्नायू आणि कंबरेवर ताण आल्याने तेथील चरबी घटण्यास मदत होते. या आसनामुळे पाठीचा कणा मजबूत होण्यासही मदत होते.

शलभासन

या आसनामुळे पाठ आणि पोटाचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. तसेच यामुळे छातीचे स्नायू मोकळे होण्यास मदत होते आणि श्वास घेण्याची प्रक्रिया सुलभ होते. त्यामुळे दमा असणाऱ्यांनी हे आसन नियमित करावे.

उष्ट्रासन

छातीचे स्नायू उघडण्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त ठरते. शरीर मागच्या बाजूला ताणले गेल्याने या स्नायूंना ताण मिळतो आणि श्वास घेणे सोपे होते. त्यामुळे हे आसन करावे.

ताडासन

श्वसनप्रक्रिया नियमित होण्यासाठी शरीर ताणल्यास फायदा होतो. दमा असणाऱ्या रुग्णांना योग्य पद्धतीने श्वास घेता यावा यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. दिर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या काही समस्या कमी होऊ शकतात. ताडासनामध्ये श्वसनक्रिया महत्त्वाची असल्याने हे आसन केल्यास दमेकऱ्यांना फायदेशीर ठरते.

कटी चक्रासन

कटीचक्रासन म्हणजे उभे राहून कमरेतून मागच्या बाजूने फिरणे. या आसनामुळे संपूर्ण शरीराला उत्तम व्यायाम होतो. त्यामुळे श्वास घेणे आणि सोडणे या क्रिया नीट होण्यास मदत होते. त्यामुळे कटी चक्रासन रोजच्या कोज करणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2018 2:16 pm

Web Title: world asthma day 2018 useful yoga poses
Next Stories
1 १७ मे रोजी लॉन्च होणारा OnePlus 6 मिळणार ***** रुपयांना
2 असा पाहा तुमचा क्रेडिट रिपोर्ट
3 ‘हे’ आहेत आंबा खाण्याचे फायदे
Just Now!
X