05 June 2020

News Flash

World Cancer Day : अशी लक्षणे आढळल्यास असू शकतो कर्करोग

जंक फुड, सतत चुकीचा आहार, बदलती जीवनशैली, प्रदूषण यासारख्या गोष्टी देखील कर्करोगाला कारणीभूत आहेत.

कॅन्सर किंवा कर्करोग अतिशय गंभीर स्वरुपाचा आजार. हा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. यातल्या कर्करोगाच्या काही प्रकारावर अजूनही उपाय शोधले जात आहे. कर्करोग नेमका कोणाला होऊ शकतो हे ठामपणे सांगता येत नाही. पण काही कारणे अशी आहेत ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका अधिक आहे. यातले पहिले कारण म्हणजे तंबाखू किंवा सिगारेट. वारंवार आपण कर्करोगाच्या जनजागृतीसाठी करण्यात आलेल्या जाहिराती पाहतो. यात या प्रमुख दोन कारणामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो असे सांगतात पण या व्यतिरिक्तही अनेक कारणे आहे. जंक फुड, सतत चुकीचा आहार, बदलती जीवनशैली, प्रदूषण यासारख्या गोष्टी देखील कर्करोगाला कारणीभूत आहेत.

खरे तर तंबाखूजन्य पदार्थांनंतर कर्करोग होण्यामागे बदलती जीवनशैली देखील कारणीभूत असल्याचा निष्कर्ष संशोधनातून समोर आला आहे आणि ते खरेही आहे म्हणा. घड्याळ्याच्या काट्यांवर चालणारे धाकाधकीचे जीवन, त्यातून सकस आहार न मिळणे, ताण तणाव अशा अनेकही गोष्टी हळूहळू आपल्याला कर्करोगाच्या दरीत ढकलत असतात. हल्ली आपण इतके व्यस्त होतो कि आरोग्याची काळजी घ्यायला देखील आपल्याकडे वेळ नसतो. त्यातून या कर्करोगाबद्दल दुर्दैवी बाब म्हणजे या रोगाचे निदान व्हायला उशीर लागतो. ब-याच रुग्णालयाच्या बाबतीत कर्करोगाच्या दुस-या किंवा तिस-या टप्प्यात या रोगाचे निदान झाल्याचे देखील समजते. काही वेळा योग्य ते उपचार करून रुग्ण यातून बरा होता पण काहींच्या नशीबी मात्र मरण असते. पण कर्करोगाची काही लक्षणे आहेत जी लक्षणे तुम्हाला आढळली तर याचे योग्य वेळी निदान करून त्यावर वेळीच उपाय करू शकता.

शरीरातल्या एखाद्या अवयवात पेशी निकामी होण्याची प्रक्रिया सुरूहोते. निकामी होत चाललेल्या पेशींचा साठा व्हायला सुरुवात होते आणि त्यातून गाठ किंवा टय़ूमर तयार होतो. असा टय़ूमर ही कर्करोगाची पहिली खूण असते.

कर्करोगाची लक्षणे
– स्तनात किंवा शरीरातील काही भागत गाठी तयार होणे.
– खोकला किंवा सतत घसा दुखणे
– दिर्घ काळापासूनची दुख
– तोंडातली बरी न होणारी जखम
– अन्न गिळताना त्रास होणे
– अचानक आवाजात बदल होणे
– लघवी किंवा मलातून रक्तस्त्राव होणे
– वारंवार चक्कर येणे किंवा भूक न लागणे
– वजनात अचानक घट होणे

ही लक्षणे अगदी सामान्य असून, तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून निदान करून घेणे आवश्यक आहे.  कर्करोगाबद्दल बरेच गैरसमज आहेत. त्याचे उपचार कसे केले जातात याबद्दल पुरेशी माहिती नसतानाच निव्वळ भीतीपोटी उपचार घेणं लोक टाळतात. उपचारांच्या दुष्परिणामांना घाबरून ते मध्येच सोडून दिले जातात. हे टाळलं तर आपल्याकडे ही कर्करोग उपचारांचा ‘सक्सेस रेट’ वाढू शकतो!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2019 9:54 am

Web Title: world cancer day 2019 cancer overview causes
टॅग Cancer
Next Stories
1 World Cancer Day : मोठया आतड्याचा कर्करोग, लक्षणे आणि उपाय
2 हानीकारक चरबी कमी करण्यासाठी व्यायाम उपयुक्त
3 आहारविषयक सवयींत व्यायामामुळे सुधारणा
Just Now!
X