World Environment Day 2019 Theme, Slogans : दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणं, समस्या, संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणं हा यामागचा मुख्य उद्देश होय. पर्यावरणासाठी पुरक निर्णय घेण्याची क्षमता लोकांमध्ये निर्माण व्हावी म्हणूनच पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.

पर्यावरणाच्या संवर्धनात अधिकाअधिक देशांनी सहभागी व्हावं यासाठी १९८७ पासून दरवर्षी एकएक संकल्पना ठरवून वेगवेगळ्या देशाकडे जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद देण्यात येतं. २०१८ च्या जागतिक पर्यावरण दिनाचं यजमानपद भारताकडे होतं. तर यंदाचे यजमानपद कोलंबिया आणि जर्मनी या दोन देशांनी संयुक्तपणे भूषवलं आहे.  जैवविविधता ही यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम आहे. निसर्गाचा र्हास थांबवणे, त्यातील वैविध्यता जपणं यासाठी पाऊल उचलण्याची गरज असल्याचे या थीमद्वारे अधोरेखित करण्यात आले आहे.

mla dadarao keche bjp martahi news
मंत्रोच्चार, कलशपूजन व अभिषेक! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची पूर्वतयारी
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
financial year came to an end Be careful when completing transactions
Money Mantra : आर्थिक वर्ष संपत आले; व्यवहार पूर्ण करताना ‘ही’ काळजी घ्या

Environment शब्द आला कुठून?
पर्यावरण (Environment) हा शब्द मूळ फ्रेंच शब्द ‘Environ’ या शब्दापासून तयार झाला आहे. ‘Environ’ म्हणजे ‘Surrounding or encircle’. सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय.

पर्यावरण दिनाची सुरूवात कशी झाली
पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील आघाताचे परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांतीच्या फळांबरोबर त्याचे दूरगामी गंभीर परिणाम मानवाला भेडसावू लागले. त्यामुळे १९६० पासून पर्यावरण हा विषय स्वतंत्र्यरित्या अभ्यासाठी येऊ लागला. बदलत्या हवामानाचे परिणाम हळूहळू जगाला जाणवू लागले होते. भविष्यात याचे गंभीर परिणाम मानव जातीला भेडसावू लागतील, फक्त मनुष्यजीवांवरच नाही तर पशू- पशी सगळ्यांनाच याचे परिणाम भोगावे लागतील याची जाणीव सगळ्यांना होऊ लागली म्हणूच पर्यावरण संरक्षणासाठी ५ जून १९७२ या दिवशी स्टॉकहोम येथे बदलत्या वातावरणाची दखल घेत काही देशांची मंडळी एकत्र जमली. बदलते हवामान आणि पर्यावरण याची दखल घेण्यासाठी ही परिषद आयोजीत करण्यात आली होती. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९७४ पासून ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा करण्यात येऊ लागला.