चीनपासून फैलाव झालेल्या करोनाविषाणूचं सावट देशावरही आहे.त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सारं काही बंद आहे. त्यामुळे नागरिक घरीच बसून आहेत. मात्र घरी बसून आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची प्रत्येकाने पुरेपूर काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे नियमितपणे योग,व्यायाम प्रत्येकाने केला पाहिजे. विशेष म्हणजे असे काही व्यायाम प्रकार आहेत. जे घरबसल्या अगदी १० ते १५ मिनिटांत करता येऊ शकतात.

दरम्यान, ज्यांनी अद्यापही व्यायाम, योग करायला सुरुवात केली नसेल त्यांनी आज ‘जागतिक आरोग्य दिन’चं निमित्त साधत योग करायला सुरुवात केली पाहिजे.