डॉ. नारायण गडकर

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जण त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, शरीराची हेळसांड होते आणि अनेक व्याधींना आमंत्रण मिळतं. यातच सध्या अनेक जण हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्तदाब अशा समस्यांनी त्रस्त आहेत. यात हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. वयाच्या २२-२३ वर्षाच्या तरुणांमध्येही समस्या जाणवत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे या समस्येकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे आज ‘वर्ल्ड हार्ट डे’च्या निमित्ताने हृदयरोगाला दूर ठेवायचं असेल तर कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ते जाणून घेऊयात.

हृदयविकार टाळण्यासाठी खास टीप्स –

१. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हृदयाच्या धमक्यांवर परिणाम होतो. यामुळे धुम्रपान आणि मदयपानाचे सेवन करणे टाळावेत.

२. योगासने करा.

३. शक्यतो शाकाहारी जेवण करण्यावर भर द्या.

४. नियमित व्यायाम करा.

५. योग्य पद्धतीचा आणि सकस आहार घ्या.

६. सतत एका जागी बसून काम करु नका. त्यामुळे स्थुलता येते आणि अनेकदा हृदयावर त्याचा परिणाम होतो.

७. सायकलिंग, चालणे, धावणे यासारखे व्यायाम प्रकार करा.

८. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा.

(लेखक डॉ. नारायण गडकर हे चेंबूरमधील झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे कार्डिओलॉजिस्ट सल्लागार आहेत.)