डॉ. विभोर बोरकर

२८ जुलै हा दिवस ‘जागतिक हेपेटायटीस दिन’ म्हणून साजरा केला जातो. हेपेटायटीस म्हणजे यकृताचा दाह. हा आजार हिपॅटायटीस विषाणू ए, बी, सी, डी आणि इ यांच्यामुळे व इतरही काही कारणांमुळे होतो. त्यामुळे हा नेमका आजार काय आहे, त्याची लक्षणे कोणती आणि त्यावर उपाय कोणते हे जाणून घेऊ.

Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
man died due to lightning fall in unseasonal stormy rain
बुलढाणा : वादळी पाऊस, गारपीटपासून जीव वाचवण्यासाठी ‘पोकलॅन’खाली आसरा घेतला; मात्र…
tiffin box recipe chavli masala in marathi
Lunch box recipe : ‘चवळी मसाला’ सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी; कशी बनवावी पाहा
World idli day 2024 how to make healthy oats idli
World idli day : पौष्टिक अन् झटपट नाश्त्यासाठी बनवा ‘ओट्स’ इडली; पाहा रेसिपी, प्रमाण

‘हेपेटायटीस’ म्हणजे काय?

‘हेपेटायटीस’ हा यकृताचा एक विकार आहे. या आजारात यकृताला सूज येते. ‘हेपेटायटीस’ विषाणूच्या संसर्गामुळे हा आजार होतो. विशेषतः यकृतास लागण झालेल्या बऱ्याच विषाणूंपैकी भारतीय लोकांमध्ये ‘हेपेटायटीस’ ए, बी, सी आणि ई विषाणूंची लागण सर्वाधिक झालेली पाहायला मिळते. हेपेटायटीस ए आणि ई संसर्ग कमी काळ टिकतो. तथापि, ‘हेपेटायटीस’ बी आणि सी विषाणूंचा संसर्ग झाल्यास तो अधिक वर्ष तग धरून राहू शकतो. वेळीच निदान व उपचार न झाल्यास आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.

१. हेपेटायटीस ए आणि ई संसर्ग कसा होतो?
दुषित अन्नपदार्थांचे सेवन आणि अशुद्ध पाणी पिण्यामुळे अनेकांना हेपेटायटीस ए आणि हेपेटायटीस ई संसर्ग झाल्याचं पाहायला मिळतं. या आजारात पोटात दुखणं, मळमळ, उलट्या, कावीळ, लघवी पिवळी होणे आणि थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसून येतात. हे दोन्ही संक्रमण अल्पकाळ टिकतात. साधारणतः एक ते दोन आठवड्यात रूग्ण बरा होतो. महत्त्वाचं म्हणजे, गर्भवती महिलांमध्ये हेपेटायटीस ई या आजाराचा संसर्ग होण्याचा धोका अधिक संभवतो. त्यामुळे या काळात महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

हेपेटायटीस ए किंवा ई ची लागण झाल्यास काय करावेत ?

या आजारावर विशेष असे उपचार उपलब्ध नाहीत. परंतु, या विकाराची लागण झाल्यास घरगुती उपयोग करू शकतो. याशिवाय संसर्गाचा धोका पूर्णतः बरा होईपर्यंत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्या. अधिक काळ आजार टिकून राहिल्यास रूग्णांना तातडीने रूग्णालयात दाखल करा. कारण, यकृतावर परिणाम झाल्यास ते निकामी होण्याचा धोका असतो. अशावेळी वेळीच उपचार न झाल्यास यकृत प्रत्यारोपणाशिवाय दुसरा पर्याय नसतो. वेळेवर प्रत्यारोपण न झाल्यास रूग्णाच्या जीवावर बेतू शकतं.

२. हेपेटायटीस बीमध्ये काय फरक आहे?

हेपेटायटीस बी संसर्ग यकृतमध्ये बराच काळ राहून यकृताला नुकसान पोहोचवतो. यामुळे यकृताचा कर्करोगही होऊ शकतो. विशेष म्हणजे, वीर्य, योनिमार्गातील द्रव आणि रक्तासारख्या शरीरातील द्व्यांशी संपर्क आल्यास व्यक्तीला हेपेटायटीस बी व्हायरसची लागण होऊ शकते. याशिवाय प्रसूतिदरम्यान,रक्त संक्रमणातून, असुरक्षित लैंगिक संबंध आणि आईपासून नवजात बाळाला हा आजार होऊ शकतो. त्यामुळे जर एखाद्यास हा संसर्ग झाला असेल तर त्याने लगेचच यकृत तज्ज्ञाकडून सल्ला घ्यावा.

३. इतर विषाणूंपेक्षा हेपेटायटीस सी घातक ठरतो का?

या आजारात हेपेटायटीस बी सारखीच लक्षणे असतात. परंतु, हा आजार अधिक काळ टिकून राहतो आणि हळूहळू यकृताचा इजा करतो. यामुळे यकृताचा सिरोसिस किंवा यकृताचा कर्करोग होऊ शकतो. या आजारावर औषधोपचार उपलब्ध असून ही औषध तीन ते सहा महिन्यांमध्ये घ्यावी लागतात. हेपेटायटीस सी आजाराची लक्षणे ओळखणे आणि यकृताचे नुकसान होण्यापूर्वी तातडीने निदान व उपचार करणे आवश्यक आहे.

हेपेटायटीसची ‘बी’ व ‘सी’ची लक्षणे –
१.भूक मंदावणे
२.अंगावरील त्वचा आणि डोळे पिवळे होणे (कावीळ)
३. शौचाचा रंग फिकट व मूत्राचा रंग गडद असणे
४. पोटात दुखणे, सांधे दुखणे
५. थकवा, अचानक वजन कमी होणे
६.ताप, मळमळ, उलट्या

अशी घ्या काळजी
१. पौष्टिक आहाराचे सेवन आणि शुद्ध पाणी प्यावेत

२. शाळांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी असल्याची खात्री करून घ्या

३. हेपेटायटीस ए या आजारावर लस उपलब्ध असून वयाच्या १ वर्षांनंतर ही लस कोणीही घेऊ शकतो

४. हेपेटायटीस बी आणि सी संसर्ग होऊ नये म्हणून असुरक्षित लैंगिक संबंध टाळावेत

५. हेपेटायटीस बीसाठी लस उपलब्ध असून जन्मानंतर ती बाळाला द्यावी लागते.

६.काविळची लागण झाल्यास तातडीने डॉक्टरांना संपर्क साधा

७. नियमित आरोग्य चाचणीत हेपेटायटीस बी आणि सी संसर्गाची लागण झालेली आहे का याची तपासून पहा.

(लेखक डॉ. विभोर बोरकर हे मुंबईतील ग्लोबल रूग्णालयात बालरोग गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि हेपेटालॉजिस्ट आहेत.)