तुम्हालाही वेगळ्या चवीची इडली खायची असेल तर ‘इडली विथ पिझ्झा टेस्ट’ आणि ‘मुगाचा इडली ढोकळा’ नक्की ट्राय करा. आज वर्ल्ड इडली डे आहे त्यानिमत्तानं इडलीच्या दोन हटके रेसिपी.
‘इडली विथ पिझ्झा टेस्ट’
साहित्य
एक भांडे तांदळाचा रवा,
एक चमचा उडीद डाळ, एक चमचा मुगाची डाळ, एक चमचा चणाडाळ, एक चमचा पोहे, पिवळ्या कणसाचा किसलेला कीस,
एक वाटी पालक, आले, मिरची
पिझ्झाचा मसाला
दीड चमचा तेल,
दोन चमचे बटर
मक्याचे दाणे उकडलेले अर्धी वाटी
दोन टोमॅटो किसलेले,
चिली फ्लेक्स एक चमचा, आमचूर पावडर एक चमचा, दोन चमचे टोमॅटो सॉस, अर्धा चमचा गरम मसाला, मीठ.
कृती
तांदूळ, डाळी व पोहे वेगवेगळे भिजत घालावेत व दोन तासांनी सगळ्या डाळी व तांदूळ वाटून घ्याव्यात.
पालक धुऊन घ्यावा व तो मिक्सरमधून वाटून घ्यावा. त्याची पेस्ट करून त्या मिश्रणाची (डाळी व तांदळाचे) घालावी. किसलेले कणीस घालावे. मीठ घालावे. आले, लसूण, मिरची घालावी व सर्व एकत्र करून त्यात थोडे मीठ घालावे. फ्रुटसॉल्ट घालून छोटी इडली करावी.
मसाल्यासाठी – दोन चमचे तेल, दोन चमचे बटर, पाव वाटी मक्याचे उकडलेले दाणे, दोन किसलेले टोमॅटो, चिली फ्लेक्स, आमचूर पावडर, मीठ, तिखट, थोडा गरम मसाला हे सर्व एकत्र घालून एक उकळी आणावी. नंतर गॅस बंद करून त्यात गार झालेल्या इडल्या घालाव्या व जरा परतून घ्यावा व त्या प्लेटमध्ये घालून त्यावर चीझ व कोथिंबीर घालावी व खाण्यास देणे.

‘मुगाचा इडली ढोकळा’

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
CSK vs LSG : मार्कस स्टॉयनिसच्या शतकाच्या जोरावर लखनऊने चेन्नईचा ६ विकेट्सनी उडवला धुव्वा, ऋतुराजची खेळी ठरली व्यर्थ
Twinkle Khanna reacts on performing in Dawood Ibrahim party
ट्विंकल खन्नाने अंडरवर्ल्ड डॉनच्या पार्टीत केला होता डान्स? प्रतिक्रिया देत म्हणाली, “दाऊदने…”
Cheteshwar Pujara Cryptic Post About Joining Chennai Super Kings
IPL 2024: चेतेश्वर पुजारा चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात सामील होणार? पुजाराच्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
Video Hardik Pandya Trolled Again For Praying At Gujarat Somnath Temple
Video: शेवटचा पर्याय ‘तोच’! हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या सलग तीन पराभवानंतर पोहोचला गुजरातला अन्..

साहित्य

१ वाटी मुगाच्या डाळीचे पीठ
अर्धी वाटी आंबट ताक
अर्धी वाटी कोमट पाणी
आलं
मिरची बारीक करून
अर्ध्या लिंबाचा रस
अर्धा टे.स्पून तेल
हळद
पाव चमचा खाण्याचा सोडा
तेलाची फोडणी
साखर 1 चमचा
बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीपुरते मीठ

पाककृती

एक वाटी मुगाच्या डाळीचे पीठ, अर्धी वाटी आंबट ताक आणि अर्धी वाटी कोमट पाणी घालून भिजवून पातेल्यात ५ ते ६ तास झाकून ठेवावे.
पीठ फुगून वर आले की त्यात आले, मिरची, मीठ, हळद, अर्ध्या लिंबाचा रस, अर्धा चमचा तेल घालावे.
इडली पात्रात तळाला पाणी घालून गॅसवर ठेवावे, इडली पात्रातील ताटल्यांना तेल लावावे. पाण्याला उकळी आली की मिश्रणात सोडा घालून चांगले हलवून इडलीपात्रात ठेवावे. (पिठात सोडा अगदी पीठ इडली पात्रात घालायच्या वेळीच घालावा.)
ढोकळा तयार होतोय तोवर फोडणी तयार करून घ्यावी. लहानश्या कढल्यात किंवा लोखंडी पळीत १-२ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहरी, हिंग, हळद, घालून फोडणी तयार करावी. फोडणी किंचीत कोमट होऊ द्यावी. एका वाटीत २ चमचे पाणी, १ लहान चमचा साखर यांचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण फोडणीत घालावे.
१० ते १५ मिनिटांनी गॅस बंद करावा. १-२ मिनिटांनी पात्र बाहेर काढावे. इडली ढोकळा जरा गार झाला की पात्रातून काढून त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरावी आणि कोथिंबीर घालावी.

सौजन्य : अभिजित पेंढारकर