तंबाखूचे व्यसन हा अजार नव्हे, ज्यासाठी औषधाची गरज आहे. हे व्यसन सोडण्यासाठी खंबीर निश्चय करायला हवा. आज, ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनी. ज्यांना तंबाखूचे व्यसन आहे अशांनी ते सोडण्यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चय करण्याचा दिवस. या कार्यात तुम्हाला फायदेशीर ठरतील असे काही उपाय आम्ही येथे सुचवत आहोत. तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी तुम्हाला ते फायदेशीर ठरू शकतात.

  • ध्रुम्रपान सोडण्याचा दृढनिश्चय करावा
  • जास्तीत जास्त द्रवपदार्थांचे सेवन करावे – तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी पहिले तीन दिवस भरपूर पाणी प्यावे. सोबत ज्यूसचेदेखील सेवन करावे. यामुळे शरीरातील अधिक मात्रेतील निकोटिन शरीराबाहेर पडण्यास मदत होईल. ग्रीन टी फायदेशीर ठरू शकतो. काही दिवसांसाठी ब्लॅक टी आणि कॉफी टाळावी.
  • जेवणानंतरच्या सवयींमध्ये बदल करावा – जेवणानंतर तंबाखू चघळण्याची अथवा सिगारेट ओढण्याची सवय काहींना असते. यामुळे जेवण पचण्यास मदत होते असा त्यांचा भ्रम असतो. तंबाखू अथवा सिगारेटऐवजी एखादे फळ, चॉकलेट किंवा च्युइंगमचे सेवन करू शकता.
  • लक्ष अन्यत्र वळवा – सिगारेट ओढण्याची अथवा तंबाखू खाण्याची इच्छा झाल्यास तिला ताबडतोब दाबून टाका. अशावेळी तुमचे लक्ष अन्यत्र वळवा. टीव्ही पाहा, शॉवर घ्या, मित्राशी गप्पा मारा, एखादे छानसे पुस्तक वाचा किंवा आवडता पदार्थ खा, अशा अनेक गेष्टी तुम्ही करू शकता. मन दुसऱ्या गोष्टीत रमविल्यामुळे विचारावर मात करता येऊ शकते.
  • स्वत:लाच बक्षिस द्या – व्यसनावर मात करण्यासाठी केलेल्या प्रत्येक यशस्वी प्रयत्नासाठी स्वत:ला बक्षिस देऊन प्रोत्साहित करा. असे करत राहिल्याने तुम्हाला प्रेरणा मिळेल.
  • ब्रश करा – जेव्हा तंबाखू खाण्याची अथवा सिगारेट ओढण्याची इच्छा होईल, तेव्हा ब्रश करा. यामुळे तंबाखू खाण्याची अथवा सिगारेट ओढण्याची तीव्र इच्छा कमी होईल. पुदीन्याची पाने चघळणेदेखील गुणकारी ठरू शकते.
  • खोल श्वास घ्या – रोज काही काळ एका जागेवर बसून खोल श्वास घ्यावा, ज्यामुळे तंबाखू खाण्याची अथवा सिगरेट ओढण्याची तीव्र इच्छा कमी होईल.
  • जिनसेंगचा वापर करा – डॉक्टरांच्या सल्ल्याने नाश्त्यामध्ये जिनसेंग पावडरचा वापर करावा. डोपामाइनची मात्रा कमी करण्यास फायदेशीर ठरते. निकोटिनमध्ये डोपामाइन सर्वाधिकप्रमाणात आढळून येते.
  • व्यसनमुक्तीचा संदेश असलेले रबरी ब्रेसलेट – जेव्हा तंबाखू खाण्याची अथवा सिगरेट ओढण्याची इच्छा होईल, तेव्हा हे ब्रेसलेट तुम्हाला व्यसनमुक्तीची आठवण करून देईल.
  • व्यायाम करावा – नियमित व्यायाम केल्याने आरोग्य तर चांगले राहते. मनात व्यसनाचा विचार डोकावल्यास जिथे असाल तिथे थोडीफार शारीरिक कवायत करून अथवा शक्य असल्यास १०- २० पुशअप्स मारून हलकासा व्यायाम करावा. यामुळे व्यसनाचे विचार दूर पळण्यास मदत होईल.
  • ध्यानधारणा – दिवसभरात १० ते १५ मिनिटे ध्यानधारणा केल्यास तुम्ही इच्छांवर ताबा मिळवू शकता. याचा फायदा व्यसनमुक्तीसाठी होऊ शकतो.
  • ‘राष्ट्रीय तंबाखू शमन हेल्पलाइन’ अर्थात ‘क्विटलाइन’ची मदत घेऊ शकता. धूम्रपानाचं व्यसन असणारे १८००-२२७७८७ या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी करून या हेल्पलाइनची मदत घेऊ शकता. या हेल्पलाइनद्वारे तुम्हाला इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, गुजराती आणि बंगाली भाषांमध्ये समुपदेशन मिळते.
  • निकोटीन पॅच : यामुळे तुमच्या शरिरातून निकोटीनचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. मानेच्या किंवा दंडाच्या केसरहित त्वचेवर हा पॅच लावण्यात येतो. हा पॅच दिवसाला किमान १६ तास ठेवला जातो. हा इलाज आठ आठवडय़ांनी थांबवता येतो.
  • निकोटीन गम : निकोटीनवाला च्युईंग गम दाढेत धरून ठेवायचा असतो. दर अर्ध्या तासाने च्युईंग गमचा चावा घेतला की ती मिरमिरते. तेवढा काळ दाढेतून निकोटीन शोषलं जातं. तोंडात च्युईंग गम असताना त्यावेळी काहीही खाणे किंवा पिणे वर्ज्य करावे. हा उपाय सलग 12 आठवडे केल्यास धुम्रपान सोडण्यात मदत होते.
  • निकोटीन लॉझेन्जेस : या लिमलेटी गोळ्यांचा चावा न घेता त्या नुसत्याच चघळायच्या असतात. त्या काळातही काही खाता-पिता येत नाही.
  • निकोटीन स्प्रे आणि इनहेलर : या दोन्ही प्रकारातले औषध नाका-तोंडातूनच शोषले जाते. इनहेलरचा मोठा फायदा म्हणजे तो सिगारेटसारखाच ओठात धरता येतो. यामुळे तुम्हाला आपण जणू काही सिगारेट ओढत आहोत असा भास होतो आणि नकळत उपचारही होतो.

Yoga for a healthy liver: Here are 3 asanas that work
यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर; जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत
man died due to lightning fall in unseasonal stormy rain
बुलढाणा : वादळी पाऊस, गारपीटपासून जीव वाचवण्यासाठी ‘पोकलॅन’खाली आसरा घेतला; मात्र…
How To Save Electricity Bill Through Cooler
उन्हाळ्यात कुलरमुळे येणारं वीज बिल कमी करण्यासाठी कमाल जुगाड; प्लास्टिकच्या बाटलीचा ‘असा’ वापर करुन पाहा अन् पैसे वाचवा
2024 Bajaj Pulsar N125
Hero, Honda चा खेळ खल्लास करण्यासाठी बजाज खेळतेय नवा गेम, देशात आणतेय नवी Pulsar, किंमत…