२४ ऑक्टोबर जगभरात पोलिओ निर्मुलन दिन म्हणून साजरा केला जातो. पोलियो अथवा पोलियोमायलिटिस हा एक विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचा कोणताही उपाय नाही मात्र, योग्य वेळी लसीकरण केल्यास यापासून वाचले जाते. भारतातून पोलिओ हद्दपार झाला असल्याचं ‘जागतिक आरोग्य संघटने’नं (डब्ल्यूएचओ) २०१४ मध्येच जाहीर केलं असलं तरी पाच वर्षांच्या आतल्या बाळांना पोलिओचा डोस देणं आवश्यक आहे. पोलिओची लस जशी तोंडावाटे दिली जाते तशीच टोचण्याचीही (इंजेक्टेबल) पोलिओ लस देखील निघाली असून या दोन्ही लशींचा पोलिओपासून संरक्षण देण्याच्या कामात महत्त्वाचा वाटा असतो. लहान मुलांचे आरोग्य आणि पोलिओबाबत तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील, ज्याची उत्तरे तुम्ही शोधत असाल. जर पोलिओबदद्ल तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, त्याची उत्तरे तुम्हाला इथे मिळतील.

पोलिओ डोस पाजल्यानंतर मुले सुरक्षित होतात का?
बालकांना पोलिओपासून मुक्त करण्यासाठी तोंडावाडे लशींचा डोस (ओरल पोलिओ व्हॅक्सीन) दिला जातो. या लसीकरणांपासून मुलगा पुर्णपणे पोलिओपासून सुरक्षित होतो. याबाबत लोकांच्या मनात खूप गैरसमज आहे, त्याला दूर करणे गरजेचे आहे.

Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
Shani Nakshtra transit will be lucky for these zodiac signs will get so much money and will become rich
Shani Nakshtra : सहा महिन्यापर्यंत शनिच्या कृपेमुळे या राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतात श्रीमंत
Health Special Does pollution cause stomach disorders
Health Special: प्रदूषणामुळे पोटाचे विकार होतात का?
Eating walnuts on an empty stomach in the morning
अक्रोड खाताना ‘ही’ योग्य वेळ, पद्धत व प्रमाण पाळल्यास मेंदू होईल तल्लख; तुमच्या शरीरात काय बदलेल?

मुलाला उल्टी किंवा ताप असेल तर पोलिओ डोस द्यावा का?
लहान मुलाला कोणत्याही परिस्थिती पोलिओ डोस पाजू शकता. काही लोक बालके आजारी असल्यानंतर पोलिओ डोस देणं टाळतात. पण पोलिओचा आणि आजारीपणाचा काही संबंध नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बालकांना पोलिओ डोस द्यावा.

नवजात शिशूला पोलिओ डोस पाजावा का?
गरोदर मातेच्या बाळंतपणानंतर नव्याने जन्माला आलेल्या बाळाला २४ तासांच्या आत आरोग्याच्या दृष्टीने काही मूलभूत गोष्टी मिळणे अत्यंत गरजेचे असते. मातेच्या दुधात अनेक पौष्टिक बाबी असतात. नवजात शिशूची रोग प्रतिकारशक्ती त्यामुळे वाढते. याखेरीज त्याला पोलिओ, व्हिटॅमिन के, हिपॅटायटीस बी, बीसीजी या लसीदेखील मिळणे अत्यंत गरजेच्या असतात. नवजात बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे कोणताही धोका नाही.

लहान मुले पोलिओच्या कचाट्यात का येतात?
रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे बालके पोलिओची शिकार होतात.

 ६-७ वेळा पोलिओ डोस घेतला असेल, तरीही बालकाला पुन्हा पोलिओ डोस द्यावा का?

काहीच हरकत नाही. लहान बालकांने कितीही वेळा पोलिओ डोस घेतला असेल तरीही वयाच्या पाच वर्षापर्यंत त्याला वेळोवेळी पोलिओ डोस देणे गरजेच आहे.

पोलिओ टीकाकरण कसे आणि कधी केले जाते?
पोलिओ डोस जन्मापासून ते पाच वर्षापर्यंत द्यावा. जन्मझाल्यानंतर, सहा, दहाव्या, चौदव्या आठवड्यात बालकांना पोलिओ डोस द्यावा. त्यानंतर १६ – २४ महिन्याच्या वयातमध्ये बुस्टर डोस देणं गरजेचं आहे. तसेच सरकारकडून जेव्हा जेव्हा लसीकरण केले जाते त्यावेळी आपल्या बालकांना पोलिओ डोस द्यायचे विसरू नका…