आज आहे २३ ऑगस्ट म्हणजे जागतिक वडापाव दिन… हो म्हणजे असाही दिवस असतो का असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर ‘हो’ असे आहे. अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही म्हणजे वडापाव. जगभरामध्ये बॉम्बे बर्गर म्हणूनही वडापाव ओळखला जातो. आज जगभरामध्ये वडापाव पोहचला आहे. मात्र मुंबईकराइतके वडापावचे महत्व इतर कोणालाही समजणार नाही हेही खरचं. याच मुंबईत मिळणारे काही खास वडापाव जे तुम्ही एकदा आवर्जून ट्राय करायला हवेत…

Funny Slogan Written Behind Indian Trucks mothers love photo Goes Viral
“कितीही मोठे झालो तरी…” ट्रकच्या मागे लिहली भन्नाट शायरी; PHOTO पाहून कराल कौतुक
viral video unhygienic lemon juice selling at kharghar railway station mumbai
उन्हाळ्यात रेल्वेस्थानकाबाहेर लिंबू पाणी पिताय? मग जरा सावधान; हा VIDEO पाहाच
Do you know the police in this city ride buffaloes for patrolling?
बफेलो सोल्जर्स! ‘या’ ठिकाणी पोलीस चक्क रेड्यावर बसून घालतात गस्त!
man riding on bull viral video
बापरे! भररस्त्यावर तरुण झाला रेड्यावर स्वार! व्हायरल Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण…

१)

आराम वडापाव
विशेष: बटाट्याची पांढरी भाजी
कुठे: आराम उपहारगृह (स्थापना 1939), मुंबई सीएसटी स्टेशनसमोर

 

२)

गजानन वडापाव ( स्थापना 1978)
विशेष: पिवळ्या रंगाची चटणी
कुठे: भगवती शाळेजवळ, विष्णू नगर, ठाणे</p>

 

३)

अशोक वडापाव किंवा किर्ती कॉलेज वडापाव (1983 पासून)
विशेष: चटणी आणि वडापावबरोबर दिला जाणार चुरा
कुठे: किर्ती कॉलेजजवळ, दादर (पूर्व)

 

४)

आनंद वडापाव
विशेष: मेयो वडापाव, चीझ वडापाव
कुठे: मिठीभाई कॉलेज जवळ, विलेपार्ले (पश्चिम)

 

५)

मसाला वडापाव
विशेष: पावाला लावण्यात येणारा मसाला
कुठे: कालिदास नाट्यगृहाजवळ, मुलुंड (पश्चिम)

६)

भाऊचा वडापाव
विशेष: आलं आणि नारळाची चटणी
कुठे: पाटील भवन, एन. एस. रोड, स्टेशन रोड मुलुंड (पश्चिम)

७)

जगदीश बुक डेपोजवळचा वडापाव
विशेष: वड्याचा कुरकुरीतपणा
कुठे: जगदीश बुक डेपोच्या बाजूला, अलोक हॉटेलच्या पुढे, ठाणे (पश्चिम)

८)

शिवाजी नगरचा वडापाव
विशेष: नारळ-शेंगदाणा चटणी, लसूण चटणी आणि ठेचा
कुठे: गजानन महाराज मंदीर रोड, शिवाजी नगर, ठाणे (पश्चिम)

९)

आशा पारेख रुग्णालयासमोरील वडापाव
विशेष: आलं, पुदीना आणि पिवळी चटणी (येथे भजीही उत्तम मिळतात)
कुठे: आशा पारेख रुग्णालयासमोर, सांताक्रुज (पश्चिम)

१०)

ठाकूर वडापाव, डोंबिवली
विशेष: मक्याचा चिवडा, कांदा आणि कोबी
कुठे: आदित्य हॉलच्या समोर, आगरकर रोड, डोंबिवली (पूर्व)

११)

मंगेश वडापाव (बोरिवली)
विशेष: वड्याचा कुरकुरीतपणा (येथील सामोसाही उत्तम आहे)
कुठे: लक्ष्मी भूवन, ठाकूर शॉपिंग मॉलच्यासमोर, बोरिवली (पश्चिम)

१२)

पार्लेश्वर वडापाव (समर्थ वडापाव)
विशेष: हिरवी चटणी (येथील सामोसा तसेच भजीपाव उत्तम आहे)
कुठे: प्रेम शॉपिंग सेंटर, नेहरु रोड, नौपाडा, विलेपार्ले (पश्चिम)

१३)

अशोक साटम वडापाव (सीटीओ वडापाव)
विशेष: कोथिंबीर, कडीपत्ता आणि आल्याच्या मिश्रणात तळलेले मिरची
कुठे: महात्मा गांधी रोड, सेंट्रल टेलिग्राफ ऑफिसजवळ, आझाद मैदान, फोर्ट परिसर (मुंबई)

१४)

एलफिस्टन रोड स्टेशनचा वडापाव
विशेष: पुदिना आणि चिंचेची चटणी
कुठे: एलफिस्टन रोड रेल्वे स्टेशनबाहेर, मुंबई

१५)

ग्रज्युएट वडापाव, भायखळा
विशेष: वेगवेगळ्या प्रकराच्या चटणी
कुठे: भायखळा रेल्वे स्टेशनच्या बाहेर, भायखळा (पश्चिम)

मग काय तुम्ही यापैकी किती वडापाव खाल्ले आहेत आणि किती अजून ट्राय करायचे राहिलेत?