18 September 2020

News Flash

अजून स्वस्त झाला जगातला ‘मोस्ट पॉप्युलर’ स्मार्टफोन, 15 ऑगस्टपर्यंत ऑफर

जगातला ‘मोस्ट सेलिंग अँड्रॉइड स्मार्टफोन’ झाला स्वस्त...

जगातला ‘मोस्ट सेलिंग अँड्रॉइड स्मार्टफोन’ सॅमसंग गॅलेक्सी A 51 (Samsung Galaxy A51) भारतात पुन्हा एकदा स्वस्त झाला आहे. दक्षिण कोरियाच्या सॅमसंग कंपनीने या शानदार स्मार्टफोनच्या टॉप मॉडेलच्या किंमतीत काही दिवसांपूर्वीच कपात केली होती. आता फोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीतही कपात करण्यात आली आहे. पण कंपनीकडून करण्यात आलेली किंमतीतील कपात 15 ऑगस्टपर्यंतच असणार आहे.

सॅमसंगने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. Galaxy A51 दोन व्हेरिअंटमध्ये येतो. आता 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीत 1500 रुपयांची कपात झाली आहे. त्यामुळे हा फोन आता 23 हजार 999 रुपयांऐवजी 22 हजार 499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय 8 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेजच्या किंमतीतही दोन हजार रुपयांची कपात झाली असून हा फोन आता 25 हजार 999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

‘स्ट्रॅटजी एनालिटिक्स’च्या रिपोर्टनुसार, 2020च्या पहिल्या तिमाहीत जानेवारी ते मार्चमध्ये Samsung Galaxy A51 हा स्मार्टफोन जगातील सर्वाधिक विक्री होणारा अँड्रॉइड स्मार्टफोन फोन ठरला आहे. युरोप आणि आशियाच्या मार्केटमध्ये हा फोन लोकप्रिय ठरत असून पहिल्या तिमाहीत युजर्सकडून या फोनला शानदार प्रतिसाद मिळाला आहे.

Galaxy A51 के स्पेसिफिकेशन्स :-
सॅमसंगच्या या फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+ सुपर AMOLED इन्फिनिटी-O डिस्प्ले आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असलेल्या या फोनमध्ये ऑक्टा-कोर Exynos 9611 प्रोसेसर देण्यात आलं आहे. फोनमध्ये 8 जीबीपर्यंत रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज असून माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. याशिवाय फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल, 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि एक 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित OneUI 2.0 वर कार्यरत असून यात फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 11:57 am

Web Title: worlds most popular android smartphone samsung galaxy a51 gets a limited period price cut in india sas 89
Next Stories
1 64MP कॅमेऱ्यासह तब्बल 6000mAh ची बॅटरी, सॅमसंगच्या शानदार स्मार्टफोनचा ‘सेल’
2 भारताने ‘बॅन’ केलं Mi Browser अ‍ॅप , ‘शाओमी’च्या युजर्सना बसणार फटका
3 पदवीधारकांसाठी मंदीत संधी; मोठ्या पगारावर बँकेत काम करण्याची संधी
Just Now!
X