संगीता आणि सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली श्री संकल्प प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट यांनी आयोजित केलेला दोन दिवसीय ‘वरळी फेस्टिव्हल’ २६ आणि २७ जानेवारी रोजी पार पडला. वरळी सी फेसचे रूप या दोन दिवसांसाठी पूर्णपणे पालटून गेले होते. वरळी समुद्रकिनारा हा विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्य संस्कृती, खेळ, विविध गोष्टींची आणि पदार्थांची भव्य दिव्य बाजारपेठ आणि लोकनृत्य, संगीत या सगळ्याने सजला होता.

संगीता आणि सचिन अहिर, ओएमसीपीएलचे व्यवस्थापकीय संचालक राहुल गोम्स यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा पहिला दिवस पार पडला. या कार्यक्रमात पर्क्यूसिओनिस्ट ओमकर साळुंखेच्या शास्त्रीय शैलीने त्यांच्या कविता सादर केल्या, तर फ्ल्युटिस्ट आणि संगीतकार मिलिंद दाते यांनी रागासच्या निवडीकडे लक्ष वेधले होते. प्रख्यात बॉलिवूड पार्श्व गायक हृषिकेश चुरी यांच्या एका गाण्याने रसिकांची गर्दी केली. तर लहान मुलांसाठी खास इमॅजिका एडलाबचे मॅसकॉट बच्चेकंपनीसोबत धमाल करण्यासाठी सज्ज होते.

दुसऱ्या दिवसाची सुरुवात ही हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पंडित रतन मोहन शर्मा यांच्या ‘मॉर्निंग रागा’ शोने झाली. यानंतर युवा आणि वृद्धांना फिटनेससाठी उत्स्फूर्त करण्यासाठी उत्साहवर्धक झुम्बा सत्र देखील आयोजित करण्यात आले होते.

द ड्युअल कोर बॅन्डने संगीतकारांच्या सहकार्याने क्लासिक हिट्स गाणी परफॉर्म केली. त्यानंतर गायक शिबानी कश्यपच्या सुंदर सूफी- वेस्टर्न फ्यूजनने देखील प्रेक्षकांना एक सुंदर अनुभव उपस्थितांना दिला. इंडिपॉपच्या सुंदर फ्युजनसह, खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेऊन सर्वांना या फेस्टिव्हलचा मनापासून आनंद लुटता आला.