सुंदर दिसावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. त्यामुळे आपली त्वचा, केस सुंदर दिसावेत आणि ते असेच छान, सुंदर रहावेत यासाठी अनेक महिला सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक उपाय किंवा घरगुती उपाय करत असतात. आता साधारणपणे आपण कायम केस आणि चेहरा यांच्या सौंदर्याकडे लक्ष देतो. पण तुलनेने हाता-पायांच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष केलं जातं. परिणामी, त्वचा रुक्ष होणं, पायांच्या टाचांना भेगा पडणे, गुडघे काळे होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळेच आज घरच्या घरी गुडघ्यांचा काळपटपणा कसा दूर करायचा हे जाणून घेऊयात.

१. लिंबाचा रस –
सौंदर्य खुलवण्यासाठी लिंबाचा रस हा अत्यंत फायदेशीर ठरतो. विशेष म्हणजे गुडघ्यांचा काळपटपणादेखील त्यामुळे दूर होतो. यासाठी लिंबाचा रस गुडघ्यांवर लावा आणि जवळपास १ तास तो तसा ठेवा. एक तास झाल्यानंतर पाय स्वच्छ धुवून टाका. दररोज हा उपाय केल्यास गुडघ्यांचा काळपटपणा दूर होईल.

२.खोबरेल तेल –
खोबरेल तेलामुळे त्वचा हायड्रेट होते. त्यासोबतच त्वचेतील ओलावा टिकून राहतो. त्यामुळे खोबरेल तेल शरीरासाठी फायदेशीर ठरतं. तसंच गुडघ्यांचा काळपटपणा दूर करायचा असेल तर खोबरेल तेल थेट लावण्यापेक्षा त्यात अक्रोडची पावडर मिक्स करावी. ही तयार पेस्ट गुडघ्यांना लावून ३-४ मिनीटे स्क्रब करावं. त्यानंतर गार पाण्याने पाय धुवावेत.

३.ऑलिव्ह ऑइल –
दोन चमचे ऑलिव्ह ऑइल आणि दोन चमचे साखर एकत्र करुन हे मिश्रण गुडघ्यांवर लावावं. त्यानंतर थोडावेळ त्याने स्क्रब करावं. पाच मिनिटे ही पेस्ट अशीच गुडघ्यांवर ठेवून नंतर धुवून टाकावी.

४. कोरफड –
कोरफडीचा रस १५ मिनिटे गुडघ्यांवर लावून ठेवावा. त्यानंतर कोमट पाण्याने पाय धुवावेत.

५. बेकिंग सोडा –
एक चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यात थोडंसं दूध मिक्स करावं. त्यानंतर हे मिश्रण पायाला लावून त्याने स्क्रब करावं. स्क्रब झाल्यावर ३-४ मिनिटे ही पेस्ट गुडघ्यांवर तशीच ठेवावी व नंतर पाण्याने ती धुवावी.