04 March 2021

News Flash

‘असा’ आहे शिओमी-गुगलचा Mi A -1

दोन नामवंत कंपन्यांचे एकत्रित उत्पादन

स्मार्टफोन कंपन्यांमध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरू आहे. शिओमी आणि गुगल या दोन कंपन्यांनी एकत्रितपणे तयार केलेला स्मार्टफोन नुकताच बाजारात आला आहे. नवी दिल्लीत एमआय ए १ हा फोन नुकताच लाँच करण्यात आला. यात शिओमी कंपनीचे हार्डवेअर आणि गुगलचे सॉफ्टवेअर वापरण्यात आले आहे. या फोनची किंमत आणि फिचर्सबाबत जाणून घेऊयात…

मेटल बॉडी असलेल्या या फोनला ५.५ इंचाची फुल एचडी स्क्रीन आहे. याशिवाय गोरिला ग्लासचे प्रोटेक्शनही देण्यात आले आहे. बॅक साईडला पायरोलिप्टीक कोटींग करण्यात आले आहे. ड्युएल कॅमेरा आहे. या फोनचे स्पेसिफिकेशन्स आयफोन ७ सारखे आहेत, असा दावा कंपनीने केला आहे. रियर कॅमेरा १२ मेगापिक्सलचा असून फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. शिओमीचा स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर या फोनमध्ये असून ४ जीबी रॅम आहे. या फोनमध्ये गुगलच्या अँड्रॉइड फोनची झलक दिसून येईल.

एमआयप्रमाणे या फोनमधूनही घरातील उपकरणे रिमोटच्या साह्याने वापरता येणार आहेत. या फोनला ३०८० मिलिअॅम्पिअर्स बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय ग्राहकांना फोनबरोबच ३८० व्होल्टचा टाईप-सी चार्जरही देण्यात आला आहे. या फोनची किंमत १४,९९९ रुपये असेल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून हा फोन फ्लिपकार्ट आणि शिओमी या वेबसाईटवर ऑनलाइन खरेदी करता येणार आहे. याशिवाय शिओमी, क्रोमा, ई-झोन याठिकाणीही हे फोन खरेदी करता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 6:28 pm

Web Title: xiaomi and google launched mi a1 smartphone here are price and features
Next Stories
1 पावसाळ्यात सुस्ती येते? टाळण्यासाठी हे उपाय करून पाहा
2 ३ कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलॅक्सी जे ७ प्लस बाजारपेठेत दाखल
3 ‘या’ पेयांमुळे मिळू शकतो डोकेदुखीपासून आराम
Just Now!
X