शाओमी इंडियानं हे जाहीर केलंय की कंपनीने गेल्या आठवड्यात फेस्टिव्ह सिजन सेल दरम्यान ५० लाख फोन्सची विक्री केली आहे. ‘अॅमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’ या दोन बड्या ई-कॉमर्स कंपन्यांनी दिलेल्या त्यांच्या फेस्टिव्ह सिजनच्या ऑफरमुळे हे उद्दीष्ट गाठणं शक्य झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

शाओमीच्या फोन्सचे चाहते आहेत ते सुमारे १५,००० रिटेल पार्टनर्सकडून फेस्टिव्ह डिस्काऊंट आणि ऑफर्सच्या माध्यमातून फोन विकत घेऊ शकतात. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या मदतीने शाओमी कंपनी १७,००० पिनकोड्सच्या भागात पोहोचली आहे, कंपनीनं म्हटलं आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, देशभरात १५,००० रिटेल पार्टनर्स आहेत. फेस्टिव्ह सिजनदरम्यान त्यांची विक्री ही वर्षानुवर्षे वाढतच आहे. आजवर शाओमीने भारतात ५ दशलक्ष स्मार्टफोन्सची विक्री केली आहे. इतर कुठल्याही ब्रँडने ही उंची गाठलेली नाही, अशी आमची माहिती असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. उच्च दर्जाचे आणि वाजवी किंमतीत प्रॉडक्ट विकण्याचे कंपनीचे ध्येय असल्याचे शाओमीने म्हटलं आहे. एमआय इंडियाचे मुख्य व्यवसाय अधिकारी रघू रेड्डी यांनी ही माहिती दिली.

काउंटरपॉईंट रिसर्चच्या दाव्यानुसार, भारतात एप्रिल-जूनच्या तिमाहित सुमारे १.९ कोटी स्मार्टफोन्स विकले गेले. यांपैकी एमआय इंडियाने एकट्याने ५२ लाख मोबाईल युनिट्स विकली आहेत. पहिल्यांदाच फोन विकत घेणारे किंवा नव्याने पुन्हा फोन विकत घेणाऱ्यांचा आमच्या फोन्सना चांगली पसंती आहे, असंही कंपनीनं म्हटलं आहे.