09 December 2019

News Flash

Xiaomi ने लाँच केली लहान मुलांची स्कूटर, काय आहेत फीचर्स ?

पोर्टेबल असल्याने ही स्कूटर पाहिजे तेथे सहजपणे घेऊन जाता येणं शक्य

स्वस्त स्मार्टफोन बनविण्यासाठी लोकप्रिय असलेल्या शाओमी कंपनीने आता लहान मुलांसाठी एक पोर्टेबल स्कूटर आणली आहे. चिनी चलनानुसार 249 युआन म्हणजेच जवळपास 2 हजार 500 रुपये इतकी या स्कूटरची किंमत आहे. Xiaomi 700Kids असं नाव या स्कूटरला देण्यात आलंय.

ही स्कूटर 5-फोल्ड सेफ्टी डिझाइन आणि 3 स्पीड अॅड्जस्टमेंट फीचर्ससह येते. फोल्डिंग डिझाइन असल्याने ही स्कूटर पाहिजे तेथे सहजपणे घेऊन जाता येणं शक्य आहे. वाइड ट्रॅक डिझाइन असलेल्या या स्कूटरच्या पुढील बाजूला दोन व्हिल्स आहेत. पुढील दोन्ही व्हिल्समधील अंतर 24 सेंटीमीटर इतकं आहे. पुढे दोन व्हिल्स दिल्यामुळे उतारावर देखील स्कूटरचं संतुलन योग्यपणे राहतं. यामुळे स्कूटर चालवणारा लहान मुलगा पडण्याची शक्यता कमी होते. मजबूत ग्रिप असलेले हे व्हिल्स 5 सेंटीमीटर रुंद आहेत. व्हिल्स बनविताना कंपनीने खास काळजी घेतली असून वेगळ्या मटेरियलचा वापर यासाठी करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांवर देखील या स्कूटरचा वापर करता येईल. व्हिल्सचा व्यास देखील मोठा असल्याने स्कूटर कंट्रोल करणं सोपं आहे. या पोर्टेबल स्कूटरचं वजन 50 किलोग्राम असून यात आरामदायक फुटरेस्ट आणि 14 सेंटीमीटर रुंद फुटवेल आहे. ब्रेक मागील बाजूला देण्यात आलेत. न्यूमॅटिक मॅगनेट व्हिलचा वापर करण्यात आला असून यात लाइट्स देण्यात आल्या आहेत. या लाइट्ससाठी बॅटरीची आवश्यकता नाहीये. म्हणजेच रात्री चालवतानाही इतरांना ही स्कूटर सहजपणे दिसेल.

या स्कूटरची उंची कमी-जास्त करता येते. म्हणजेच मुलाच्या उंचीप्रमाणे स्कूटरची उंची बदलता येते. यात उंचीसाठी 75 सेंटीमीटर, 82 सेंटीमीटर आणि 89 सेंटीमीटर असे तीन पर्याय आहेत.

First Published on July 18, 2019 3:41 pm

Web Title: xiaomi launches children scooter know price and all features sas 89
Just Now!
X