Xiaomi ने अखेर सोमवारी भारतात आपले पहिले ‘वायरलेस Power Bank’ हे डिव्हाइस लाँच केले आहे. 10000 mAh क्षमता असलेल्या या पॉवर बँकमध्ये मॅग्नेटिक इंडक्टिव टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.

सतत प्रवास करणाऱ्यांसाठी ही पॉवर बँक उत्तम पर्याय असल्याचं कंपनीने म्हटलंय. या वायरलेस पॉवर बँकमध्ये दोन प्रकारचे चार्जिंग पोर्ट आहेत. पहिला युएसबी टाइप ए आउटपुट पोर्ट आणि दुसरा युएसबी टाइप सी इनपुट पोर्ट. एकावेळी दोन मोबाइल डिव्हाइस चार्ज करता येतील. यामध्ये हाय-क्वालिटी लीथियम पॉलिमर बॅटरीजचा वापर करण्यात आला आहे. सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. ग्राहकांना वायरलेस टेक्नॉलजीसोबत उत्तम अनुभव मिळेल अशी अपेक्षा कंपनीकडून व्यक्त करण्यात आली आहे. या पॉवर बँकसोबत एक नॉन-स्किड वायरलेस चार्जिंग पॅडही मिळेल.

Mi 10000mAh वायरलेस पावरबँकची किंमत 2,499 रुपये ठेवण्यात आली आहे. केवळ ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असलेल्या या पॉवर बँकच्या विक्रीलाही सुरूवात झाली आहे. Mi 10000mAh वायरलेस पावरबँक mi.com, एमआय होम्स आणि एमआय स्टुडिओवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.