News Flash

Mi 10T, Mi 10T Pro आणि Mi 10T lite स्मार्टफोन्स लाँच, जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

प्रसिद्ध स्मार्टफोन मेकर कंपनी Xiaomiने Mi 10T स्मार्टफोन सीरीज लाँच केली आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन मेकर कंपनी Xiaomiने Mi 10T स्मार्टफोन सीरीज लाँच केली आहे. यामध्ये कंपनीने Mi 10T, Mi 10T Pro आणि Mi 10T Lite हे स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहे. हे दोन्ही फोन्स कंपनीचे फ्लैगशिप स्मार्टफोन्स आहेत. Mi 10T स्मार्टफोन्समध्ये144Hz रिफ्रेश रेटसह Snapdragon 865 प्रोसेसर देण्यात आलं आहे. Mi 10T आणि Mi 10T Pro मध्ये सर्वात मोठा फरक कॅमेरा सेटअपचा आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सशिवाय कंपनीने Mi 10T Pro Lite हा स्मार्टफोनही लाँच केला आहे. हे तिन्ही फोन्स ५ जी सपोर्ट करतात.

Mi 10T स्पेसिफिकेशन्स –
Mi 10T या स्मार्टफोन्सला 6.67 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे.
रिफ़्रेश रेट 144Hz इतका आहे.
इस स्मार्टफोन्समध्ये Qualcomm Snapdragon 865 प्रोसेसर दिला आहे.
हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 6GB रॅम अशा दोन व्हेरिएंटमध्ये आहे.
हा स्मार्टफ़ोन Android 10 बेस्ड MIUI 12 वर चलणार आहे.
Mi 10T मध्ये ट्रिपल रियर कॅमरा देण्यात आला आहे.
प्रायमरी सेंसर 64 मेगापिक्सलचा आहे तर सेकेंडरी सेंसर 13 मेगापिक्सलचा आहे.
सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा कॅमेर देण्यात आला आहे.
5,000mAh ची बॅटरी
फिंगरप्रिंट स्कॅनर

Mi 10T Pro स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स

6.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले
रिफ़्रेश रेट 144Hz
गोरिल्ला ग्लास 5 चं प्रोटेक्शन
ट्रिपल रियर कॅमरा सेटअप
प्रायमरी सेंसर 108 मेगापिक्सल
सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा लेन्स
5,000mAh ची बॅटरी
फिंगरप्रिंट स्कॅनरऐवजी साइड माउंटेड फ़िंगरप्रिंट स्कॅनर

Mi 10T Lite स्पेसिफिकेशन्स  

6.67 इंचाचा डिस्प्ले
120Hz रिफ़्रेश रेट
Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसर
6GB रॅम
4,820mAh बॅटरी
ट्रिपल रियर कॅमरा
प्रायमरी लेंस 8 मेगापिक्सल
सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा लेन्स

किंमत –
Mi 10T – जवळपास ४३ हजार
Mi 10T Pro – ५१ हजार ७०० रुपये

हे स्मार्टफोन्स भारतात कधी लाँच होणार याबाबत शाओमी कंपनीकडून अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र, तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे लवकर भारतीय बाजारपेठेत हा स्मार्टफोन येऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 12:10 pm

Web Title: xiaomi launches mi 10 t mi 10t pro mi 10t lite announced features nck 90
Next Stories
1 सणवार असो किंवा अन्य सेलिब्रेशन; आता घरीच तयार करा अ‍ॅपल जिलबी
2 ५ कॅमेऱ्यांच्या ‘बजेट’ स्मार्टफोनचा ‘सेल’, किंमत १० हजारांहून कमी
3 Paytm नंतर आता गुगलच्या रडारवर Zomato, Swiggy; पाठवली नोटीस
Just Now!
X