शाओमी कंपनीने एक नवीन सर्व्हिस सुरू केली आहे. याअंतर्गत तुम्ही आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे शाओमीचे स्मार्टफोन किंवा अन्य कोणतेही प्रोडक्ट्स ऑर्डर करु शकतात. शाओमीने या नव्या सर्व्हिसला Mi Commerce असे नाव दिले आहे.

याद्वारे तुमच्या जवळच्या रिटेल दुकानातून तुम्हाला तुम्ही मागवलेला फोन, टीव्ही किंवा अन्य कोणतेही शाओमीचे उपकरण घरपोच मिळेल. पण, ऑर्डर केलेल्या प्रोडक्टचे पैसे ग्राहकांना डिलिव्हरीवेळीच द्यावे लागणार आहेत. कारण या सेवेसाठी कंपनीने फक्त Payment only on Delivery असा पर्याय ठेवला आहे. WhatsApp द्वारे शाओमीचे प्रोडक्ट्स ऑर्डर करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. यासाठी ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे केवळ एका नंबरवर मेसेज पाठवावा लागेल. जाणून घेऊया ही प्रक्रिया :

  • ग्राहकांना शाओमीच्या बिजनेस अकाउंट नंबर +918861826286 वर एक मेसेज पाठवावा लागेल.
  • प्रोडक्ट ऑर्डर करण्यासाठी ग्राहकांना सर्वप्रथम हा नंबर सेव्ह करावा लागेल.
  • त्यानंतर या नंबरवर Retail store असा मेसेज पाठवावा लागेल.
  • नंतर कंपनीकडून आलेल्या काही प्रक्रिया फॉलो केल्यानंतर तुम्हाला लोकेशन आणि लाइव्ह लोकेशन शेअर करण्यास सांगितले जाईल.
  • त्यानंतर, तुम्हाला तुमच्या जवळच्या तीन रिटेल स्टोअर्सचा फोन नंबर आणि पत्ता पाठवला जाईल.
  • त्यांना फोन करुन ग्राहक कंपनीचे पाहिजे ते प्रोडक्ट ऑर्डर करु शकतात.
  • याशिवाय युजर्स Mi कॉमर्सच्या https://local.mi.com/ या वेबसाइटवर जाउनही लॉगइन करु शकतात.
  • इथे तुम्हाला तुमच्या जवळच्या रिटेल स्टोअरशी कनेक्ट करुन दिले जाईल.
  • त्यानंतर तुम्ही या सेवेचा फायदा घेऊ शकतात.
  • ग्राहकांना प्रोडक्टच्या डिलिव्हरीआधी कॉल केला जाईल.
  • ऑर्डर केलेल्या प्रोडक्टचे पैसेही डिलिव्हरीवेळीच करावे लागतील आणि पेमेंटची प्रक्रिया सुरक्षित असेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.