शाओमीने आपले नवीन वायरलेस इअरफोन Redmi AirDots 2 लाँच केले आहेत. हे नवीन इअरफोन म्हणजे Redmi AirDots आणि Redmi AirDots S साठी अपग्रेड व्हर्जन आहे. हे वायरलेस इअरफोन कंपनीने सध्या चीनमध्येच लाँच केले आहेत. पण, लवकरच ते भारतातही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

रेडमी एअर डॉट 2 या वायरलेस इअरफोनची किंमत चीनमध्ये 79 युआन म्हणजे जवळपास 845 रुपये आहे. सध्या हे इअरफोन केवळ कंपनीच्या क्राउड फंडिग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. त्यानंतर हे इअरफोन 99 युआन म्हणजे जवळपास 1,060 रुपयांमध्ये खरेदी करता येतील. क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मवर हे इअरफोन 20 जुलै ते 29 जुलै या दरम्यान खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

रेडमीच्या या वायरलेस इअरफोनमध्ये वन-की कंट्रोल फीचर आहे. यामुळे एकाच बटणाद्वारे मल्टिटास्किंग करता येतं. म्हणजे म्यूजिक कंट्रोल, कनेक्टेड डिव्हाइस, कॉल रिसिव्ह किंवा रिजेक्ट तुम्ही एकाच बटणाद्वारे करु शकतात. शिवाय बटणावर डबल टॅप केल्यास व्हॉइस असिस्टंटचा वापर करता येतो. या 43mAh क्षमतेची बॅटरी असून ही भॅटरी चार तासांचा बॅकअप देते. तर, चार्जिंग केसमध्ये 300mAh ची बॅटरी असून ती 12 तासांचा बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे. ब्लूटूथ v5.0 कनेक्टिव्हिटीचा पर्यायही या इअरफोन्ससोबत आहे.