24 April 2019

News Flash

शाओमीचा चार कॅमेऱ्यांचा Redmi Note 6 Pro, जाणून घ्या खासियत

सेल्फीसाठी असलेल्या दोन कॅमेऱ्यांपैकी एक कॅमेरा 20 मेगापिक्सलचा तर दुसरा कॅमेरा...

शाओमी कंपनीने आपला लेटेस्ट स्मार्टफोन Redmi Note 6 Pro इंडोनेशियामध्ये लाँच केला आहे. याआधी बाजारपेठेत असणाऱ्या आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरणाऱ्या Redmi Note 5 Pro या मॉडेलची ही पुढील आवृत्ती आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस Redmi Note 6 Pro चं अनावरण करण्यात आलं होतं, 6 नोव्हेंबरपासून हा फोन थायलंडमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. लवकरच हा फोन भारतातही लाँच केला जाण्याची शक्यता आहे. 12 नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात हा स्मार्टफोन लाँच केली जाण्याची अपेक्षा आहे.

Redmi Note 6 Pro हा फोन दिसायला जवळपास Note 5 Pro प्रमाणेच आहे. याच्या पुढील आणि मागील बाजूला ड्यूअल कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. म्हणजे एकूण चार कॅमेरे यात आहेत. सेल्फीसाठी असलेल्या दोन कॅमेऱ्यांपैकी एक कॅमेरा 20 मेगापिक्सलचा तर दुसरा 2 मेगापिक्सलचा आहे. मागील बाजूला 12 आणि 5 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत. 3 जीबी रॅम आणि 4 जीबी रॅम अशा दोन व्हेरिअंट्समध्ये हा फोन सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये रेडमी नोट 5 प्रो प्रमाणेच 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

रेडमी नोट 6 प्रो MIUI 10 वर आधारित अँन्ड्रॉइड 8.1 ओरियोवर कार्यरत असेल. यामध्ये 6.26 इंच आयपीएस एलसीडी फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर आहे. इंडोनेशियामध्ये 3 जीबी रॅम असलेल्या व्हेरिअंटची किंमत भारतीय चलनानुसार 14 हजार 500 रुपये आणि 4 जीबी रॅम असलेल्या व्हेरिअंटची किंमत 16 हजार 500 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

First Published on November 8, 2018 2:04 pm

Web Title: xiaomi launches redmi note 6 pro