News Flash

आता आला xiaomi चा ‘वायरलेस झाडू’ !

झाडूमध्ये 2,000mAh क्षमतेची बॅटरी , एकदा चार्ज केल्यानंतर 2 तासांचा बॅकअप

Xiaomi : आपल्या विविध स्मार्टफोनच्या जोरावर भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय ठरलेली चीनी कंपनी शाओमी आता इतर क्षेत्रांमध्येही पाऊल ठेवत आहे. स्मार्ट बल्ब आणि व्हॅक्युम क्लिनर यांसारखी घरगुती उत्पादनं आणल्यानंतर आता कंपनीने वायरलेस झाडू (Mi Wireless Handheld Sweeper) सादर केला आहे.

कंपनीने हा इलेक्ट्रिक झाडू डबल ब्रश डिझाइनसह लाँच केला आहे. 1300r/min इतका याच्या ब्रशचा स्पीड आहे. रोटेशनल फंक्शन हे या झाडूचं मुख्य वैशिष्ट्य आहे, यामुळे कोणत्याही दिशेला हा झाडू सहजतेने फिरवता येतो आणि याद्वारे जलदगतीने साफसफाई करण्यास मदत होते असा कंपनीचा दावा आहे. 270mm x 170mm इतका या झाडूचा आकारमान आहे.

कंपनीकडून या झाडूमध्ये 2,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. परिणामी सातत्याने हा झाडू चार्ज करावा लागणार नाही, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर दोन तासांचा बॅकअप मिळेल असं कंपनीने म्हटलं आहे. हा वायरलेस झाडू चीनमध्ये लाँच केला असून 99 युआन (जवळपास 1 हजार 30 रुपये) इतकी याची किंमत आहे. हा इलेक्ट्रिक झाड़ू कंपनीच्या क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 1:06 pm

Web Title: xiaomi launches wireless sweeper
Next Stories
1 Samsung Launches Vertical Tv SERO: आडवा नाही तर चक्क उभा टीव्ही
2 Airtel : 48 आणि 98 रुपयांचे नवे रिचार्ज प्लॅन, मिळणार 6GB पर्यंत डेटा
3 32MP सुपर सेल्फी कॅमेरा, Redmi Y3 चा आज पहिला सेल; मिळणार 1120 GB डेटा
Just Now!
X