27 February 2021

News Flash

Redmi Note 7 : आज भारतात होणार लाँच, 48MP कॅमेरा आणि बरंच काही

48 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असलेला Redmi Note 7 हा स्मार्टफोन अखेर आज भारतात लाँच होणार

48 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असलेला Redmi Note 7 हा स्मार्टफोन अखेर आज भारतात लाँच होणार आहे. कंपनीने गेल्या महिन्यात हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला होता. चीनची कंपनी शाओमीची नवी सब-ब्रँड कंपनी Redmi ने हा फोन सादर केलाय. नव्या Redmi मालिकेची सुरूवात Redmi Note 7 द्वारा झाली आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूला 48 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचे कॅमेरे आहेत. तर सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूला 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलाय. या स्मार्टफोनमध्ये AI फीचर्स आणि पोट्रेट मोड आहे. रेडमी नोट 7 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसरसह अँन्ड्रॉइड 8.1 ओरियोवर कार्यरत असेल. याशिवाय कंपनीकडून Redmi Note 7 Pro हा स्मार्टफोन देखील लाँच केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तीन व्हेरिअंट्स-
Redmi Note 7 मध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले असून यामध्ये वॉटरड्रॉप नॉच डिझाइन आहे. Redmi Note 7 मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 4,000mAh पावरची बॅटरी आहे. दीड दिवसांपर्यंत ही बॅटरी टीकेल असा कंपनीचा दावा आहे. यात Type-C USB चार्जिंगचा पर्यायही देण्यात आला आहे. तसंच क्वॉलकॉम क्विक चार्ज 4.0 सपॉर्ट आणि हेडफोन जॅक आहे.

Redmi Note 7 तीन व्हेरिअंट्समध्ये(3GB, 4GB आणि 6GB) उपलब्ध असेल. स्टोरेजसाठी यामध्ये 32GB आणि 64GB चा पर्याय आहे. फोनच्या मागील बाजूला ग्लास डिझाइन आहे. 3GB रैम आणि 32GB स्टोरेज असलेल्या Redmi Note 7 ची चिनमध्ये 999 युआन इतकी किंमत ठेवण्यात आलीये. तर, 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 1,199 युआन, 6GB रॅम व 64GB स्टोरेजच्या व्हेरिअंटची किंमत 1,399 युआन आहे. भारतात या स्मार्टफोनची किंमत 10,000 ते 14,000 रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

14 जानेवारी 2019 पासून या स्मार्टफोनची चिनमध्ये विक्री सुरू झाली आहे. या स्मार्टफोनसह कंपनीकडून 18 महिन्यांची वॉरंटी दिली जात आहे. भारतीय बाजारात देखील 18 महिन्यांची वॉरंटी दिली जाईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याशिवाय कंपनीने Redmi Note 7 Pro ची घोषणाही केलीये.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2019 1:49 pm

Web Title: xiaomi may launch redmi note 7 pro with redmi note 7
Next Stories
1 सॅमसंगचा बजेट स्मार्टफोन Galaxy M20 चा आज फ्लॅशसेल, जाणून घ्या ऑफर
2 कॅन्सरचा उपचार आणखी स्वस्त, ४२ औषधांची किंमत ८५ टक्क्यांनी घटली
3 फ्लूवर रामबाण लस तयार करणे शक्य होणार
Just Now!
X