X
X

लवकरच लाँच होणार शिओमीचा ड्युअल कॅमेरा फोन

READ IN APP

शिओमीचा पाहिला ड्युएल लेन्स कॅमेरा फोन

शिओमीचा बहुप्रतिक्षित असा Mi 5X हा फोन सप्टेंबरमध्ये लाँच होणार आहे. शिओमीचे भारतातले व्यवस्थापकिय संपादक मनु कुमार जैन यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. स्वस्त, सुंदर, टिकाऊ या तीन गुणांमुळे शिओमीच्या फोनला भारतीय बाजारपेठेत तुफान प्रसिद्धी मिळाली. तेव्हा Mi 5X या फोनलाही भारतीय बाजारपेठेत अपेक्षेप्रमाणे जास्त यश लाभेल असा विश्वास शिओमीला आहे. हा शिओमीचा पाहिला ड्युअल लेन्स कॅमेरा फोन असणार आहे. हा फोन देखील सर्वसामान्य माणसांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होईल.

Mi 5X ची वैशिष्ट्ये
– ५.५ इंचाचा डिस्प्ले
– ड्युअल नॅनो सिम
– अँड्राइड नॉगट ७.०
– ६२५ ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर
– ४ जीबी रॅम
– १२ मेगापिक्सेल ड्युएल रिअर कॅमेरा
– ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
– ६४ जीबी इंनटरनल मेमरी
– १२८ एक्सपांडेबल मेमरी
किंमत
सप्टेंबर महिन्यात लाँच होणाऱ्या या फोनची किंमत साधारण १४ हजारांच्या आसपास असणार नाही.

 

22
X