25 February 2021

News Flash

Xiaomi ने लाँच केले ‘कार चार्जर’, किंमत 799 रुपये

Xiaomi ने भारतीय बाजारात आणलं अजून एक खास प्रोडक्ट...

Xiaomi ने भारतीय बाजारात अजून एक खास प्रोडक्ट आणलं आहे. शाओमीने भारतात Mi Car Charger Pro लाँच केले असून mi.com वर हे कार चार्जर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या चार्जरमध्ये कंपनीने स्मार्ट IC चिप दिली असून हे कार चार्जर 12v आणि 24v इनपुटला सपोर्ट करते.  18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेल्या या कार चार्जरवर प्रोटेक्शनसाठी चार लेयर आहेत. याद्वारे, आउटपुट ओव्हर करंट, आउटपुट ओव्हर व्होल्टेज, शॉर्ट सर्किट, हाय टेम्परेचरपासून बचाव होतो, असा शाओमीचा दावा आहे.

शाओमीचे हे दुसरे कार चार्जर आहे. कंपनीने 2018 मध्ये भारतात क्विक चार्ज 3.0 सह Mi कार चार्जर बेसिक लाँच केले होते. शाओमीच्या Mi Car Charger Pro ला ड्युअल पोर्ट्स आहेत, त्यामुळे एकावेळी दोन डिव्हाइस चार्ज करत येतील. या कार चार्जरमध्ये मूनलाइट व्हाइट LED इंडीकेटर आणि ड्युअल USB सपोर्ट आहे.

799 रुपये इतकी या कारची किंमत आहे. याशिवाय, दोन दिवसांपूर्वी भारतात आपले पहिले ‘वायरलेस Power Bank’ हे डिव्हाइस लाँच केले आहे. 10000 mAh क्षमता असलेल्या या पॉवर बँकमध्ये मॅग्नेटिक इंडक्टिव टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. सतत प्रवास करणाऱ्यांसाठी ही पॉवर बँक उत्तम पर्याय असल्याचं कंपनीने म्हटलंय. या वायरलेस पॉवर बँकमध्ये दोन प्रकारचे चार्जिंग पोर्ट आहेत. पहिला युएसबी टाइप ए आउटपुट पोर्ट आणि दुसरा युएसबी टाइप सी इनपुट पोर्ट. एकावेळी दोन मोबाइल डिव्हाइस चार्ज करता येतील. यामध्ये हाय-क्वालिटी लीथियम पॉलिमर बॅटरीजचा वापर करण्यात आला आहे. सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. ग्राहकांना वायरलेस टेक्नॉलजीसोबत उत्तम अनुभव मिळेल अशी अपेक्षा कंपनीकडून व्यक्त करण्यात आली आहे. या पॉवर बँकसोबत एक नॉन-स्किड वायरलेस चार्जिंग पॅडही मिळेल.

Mi 10000mAh वायरलेस पावरबँकची किंमत 2,499 रुपये ठेवण्यात आली आहे. केवळ ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असलेल्या या पॉवर बँकच्या विक्रीलाही सुरूवात झाली आहे. Mi 10000mAh वायरलेस पावरबँक mi.com, एमआय होम्स आणि एमआय स्टुडिओवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 2:49 pm

Web Title: xiaomi mi car charger pro o18w fast charging support launched at rs 799 know all details sas 89
Next Stories
1 अखेरचे दोन दिवस शिल्लक, ‘या’ दमदार स्मार्टफोनवर ₹5000 पर्यंत डिस्काउंट
2 बंपर डिस्काउंट ! Xiaomi चे फोन स्वस्तात खरेदी करण्याचा अखेरचा दिवस
3 करोना व्हायरसचा PUBG वरही परिणाम, गेम लव्हर्सना बसणार ‘हा’ मोठा झटका
Just Now!
X