20 November 2019

News Flash

Amazon वर 4 दिवसांचा खास सेल, ‘शाओमी’च्या फोन्सवर बंपर सूट

शाओमीच्या अनेक फोनवर 6 हजार 500 रुपयांची सवलत, तसंच 4 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील

‘शाओमी’चा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या कंपनीचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची तुमच्याकडे उत्तम संधी आहे. कारण, अग्रगण्य इ-कॉमर्स संकेतस्थळ अॅमेझॉन आणि शाओमीच्या अधिकृत संकेतस्थळावर Xiaomi Mi Days Sale हा सेल सुरू झाला आहे.

17 जूनपासून सुरू झालेला हा सेल 21 जूनपर्यंत असणार आहे. यामध्ये शाओमीच्या स्मार्टफोनवर 6 हजार 500 रुपयांची सवलत मिळतेय. सवलतीसह 4 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील ग्राहकांना मिळेल. याशिवाय अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 5 टक्के इंस्टंट डिस्काउंटही मिळेल.

रेडमी नोट 6 प्रो –
फुल एचडी+ नॉच डिस्प्ले असलेला हा फोन सेलमध्ये 8,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

रेडमी 5 –
8,499 रुपये किंमत असलेला हा स्मार्टफोन या सेलमध्ये केवळ 5,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

शाओमी रेडमी 7 –
सेलमध्ये या स्मार्टफोनचं 2जीबी रॅम+32जीबी स्टोरेज व्हेरिअंट 7,999 रुपयांमध्ये तर 3जीबी रॅम व्हेरिअंट 8,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. स्नॅपड्रॅगन 632 प्रोसेसरसह येणाऱ्या या फोनमध्ये 4,000 mAh क्षमतेची बॅटरी आहे.

शाओमी रेडमी वाय3 –
32 मेगापिक्सलच्या सुपर सेल्फी कॅमऱ्यासह येणारा हा स्मार्टफोन 9,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

रेडमी 6 ए –
या स्मार्टफोनच्या 2जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेजच्या व्हेरिअंटवर एक हजार रुपयांची सूट आहे. सवलतीनंतर हा स्मार्टफोन 5,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय 3जीबी रॅम+32जीबी स्टोरेज व्हेरिअंटवर 1,500 रुपयांची सवलत आहे.

शाओमी Mi ए2 –
17,499 रुपयांच्या या स्मार्टफोनचं 4जीबी रॅम+64जीबी स्टोरेज व्हेरिअंट या सेलमध्ये 10,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत या फोनवर 3,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट देखील मिळेल.

First Published on June 18, 2019 4:30 pm

Web Title: xiaomi mi days sale 2019 on amazon starts sas 89
Just Now!
X