Xiaomi कंपनी आज(दि.11) भारतात Mi Notebook आणि Mi Notebook Horizon Edition लॅपटॉप लाँच करणार आहे. यासोबतच कंपनी भारतातील लॅपटॉप सेगमेंटमध्ये एंट्री करेल. लॅपटॉपमधील फीचर्सबाबत कंपनीने जास्त माहिती दिलेली नाही. पण लाँचिंगआधी जारी केलेल्या टीझरनुसार लॅपटॉप अत्यंत स्लिम, 12 तासांपर्यंतची दमदार बॅटरी लाइफ आणि लेटेस्ट जनरेशन इंटेल प्रोसेसरसह येईल हे स्पष्ट झालंय. पण, किंमतीबाबत अद्याप कंपनीकडून माहिती देण्यात आलेली नाही. लाँचिंगवेळीच कंपनी किंमतीचा खुलासा करेल.

करोना व्हायरस महामारीच्या संकटामुळे अन्य लाँच इव्हेंटप्रमाणे हा इव्हेंटही कंपनीने ऑनलाइन ठेवला आहे. दुपारी 12 वाजेपासून लाँच इव्हेंटला सुरूवात होईल. हा इव्हेंट तुम्ही कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि फेसबुक पेजवर लाइव्ह पाहू शकतात. याशिवाय हा लाँच इव्हेंट कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरही पाहता येईल.

शाओमीच्या लॅपटॉपची भारतात HP, Dell, Acer, Asus आणि Lenovo यांसारख्या कंपन्यांशी स्पर्धा असेल. भारतीय ग्राहकांचा विचार करुन Mi Notebook ची निर्मिती करण्यात आल्याचं कंपनीकडून यापूर्वीच सांगण्यात आलं आहे. हा लॅपटॉप म्हणजे ‘मेड फॉर इंडिया’असल्याचं शाओमी इंडियाचे प्रमुख मनु कुमार जैन यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. Mi Notebook या लॅपटॉपसोबत शाओमी भारतात पहिल्यांदा लॅपटॉप सेगमेंटमध्ये पाऊल ठेवत आहे. पण, कंपनीने ‘मी’ आणि ‘रेडमी’ ब्रँडअंतर्गत चीनमध्ये अनेक लॅपटॉप लाँच केले आहेत. यामध्ये Mi Gaming Laptop, Mi Notebook Air, आणि Mi Notebook Pro 15 यांचा समावेश आहे. 11 जून रोजी दुपारी 12 वाजता Mi Notebook साठी लाँच इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं आहे. लाँच इव्हेंट शाओमीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि Mi.com वर लाइव्ह बघता येईल. Mi Notebook ची भारतात HP, Dell आणि Lenovo यांसारख्या कंपन्यांशी स्पर्धा असेल.