21 September 2020

News Flash

स्मार्टफोननंतर आता शाओमीचे ‘स्मार्ट बूट’

'5 इन वन यूनिमोल्डिंग प्रोसेस'ने बनवण्यात आलेले हे शूज वॉशिंग मशिननेही धुता येणार

भारतीय स्मार्टफोन बाजारात एक वेगळी ओळख निर्माण करणारी चिनची कंपनी Xiaomi आता लवकरच स्मार्ट शूज लाँच करणार आहे. कंपनीने याबाबत अधिकृत ट्विटर हँडलवरुन केलेल्या ट्विटमुळे शाओमीच्या बुटांबाबत चर्चा सुरू आहे. ट्विटमध्ये बुटांचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे, त्यासोबत “Ready to put your #best foot forward.” असा संदेश आहे.


शाओमी कंपनी चीनमध्ये आधीपासून ‘मिजिया’ स्मार्ट शूज विकते. चीनमध्ये 2017 साली कंपनीने हे शूज लाँच केले होते. त्यानंतर गेल्यावर्षी ‘मिजिया स्नीकर्स 2’ लाँच केले होते. आता हे बूट भारतात देखील लाँच केले जाण्याची शक्यता आहे. काही माध्यमांतील वृत्तानुसार, कंपनी ‘मिजिया स्नीकर्स 2’ हेच शूज Mi Sports Shoes म्हणून भारतात येत्या आठवड्यात लाँच करण्याची शक्यता आहे.

या बुटांची किंमत अंदाजे 3 हजार रुपये असू शकते. चीनमध्ये हे बूट चार रंगांमध्ये उपलब्ध असून 2100 रुपयांच्या आसपास किंमत आहे. भारतातही हे बूट ब्लॅक, फ्लोरल ब्ल्यू, फ्लोरल ग्रे आणि व्हाइट रंगामध्ये उपलब्ध केले जाऊ शकतात.

हे बूट ‘5 इन वन यूनिमोल्डिंग प्रोसेस’ने बनवण्यात आले आहेत. पाच वेगवेगळे मटेरिअल वापरुन हे बूट तयार केले आहेत. 258 ग्राम इतकं यांचं वजन असून वॉशिंग मशिननेही हे शूज धुता येतील असा कंपनीचा दावा आहे. या बुटांमध्ये अनेक आधुनिक फीचर्स दिल्याचं सांगितलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 11:51 am

Web Title: xiaomi mi sports shoes coming to india soon
Next Stories
1 तंत्रज्ञानाने रुग्णवाहिकेला अपघाताचे ठिकाण कळणे शक्य
2 World Cancer Day : महिलांनो आरोग्याच्या या समस्या आहेत? तर तुम्हालाही होऊ शकतो कर्करोग 
3 जाणून घ्या दिवसातून नक्की किती वेळा खाल्लेले चांगले
Just Now!
X