07 March 2021

News Flash

Xiaomi चा ‘सुपर सेल’; 4,499 रुपयांमध्ये खरेदी करा स्मार्टफोन

Xiaomi कंपनीच्या 'सुपर सेल'चं भारतात पुनरागमन

(Poco-f1)

Xiaomi कंपनीच्या ‘सुपर सेल’चं भारतात पुनरागमन झालंय. आधीप्रमाणे यावेळीही सेलमध्ये कंपनीकडून सहा स्मार्टफोनवर भरघोस सूट मिळत आहे. शाओमीच्या संकेतस्थळावर हा सेल लाइव्ह असून 13 नोव्हेंबर अर्थात उद्यापर्यंत हा सेल सुरू असणार आहे. या सेलमध्ये Redmi Note 7 Pro, Redmi K20, K20 Pro आणि Poco F1 यांसारख्या फोन्सचा समावेश आहे.

‘सुपर सेल’मध्ये Redmi 7A आणि Redmi Go यांसारखे एंट्री लेव्हलच्या स्मार्टफोन्सचाही समावेश आहे. Redmi 7A हा स्मार्टफोन सेलमध्ये 1,200 रुपयांच्या सवलतीसह 5,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याचप्रमाणे Redmi Go या स्मार्टफोनवर 1,500 रुपयांची सवलत असून ग्राहक हा फोन 4,499 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात.

आणखी वाचा- Xiaomi Redmi Note 8 चा सेल, 1120 जीबी 4G डेटाची ऑफर

याशिवाय Redmi Note 7 Pro स्मार्टफोन सेलमध्ये 11,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ही किंमत 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची आहे. एक्सचेंज ऑफरसह ग्राहक 7,500 रुपयांच्या अतिरिक्त सवलतीचा लाभ देखील घेऊ शकतात. तर, Redmi K20 हा फोन 19,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनवर 3,000 रुपयांचं डिस्काउंट आहे.

सेलमध्ये Redmi K20 Pro हा स्मार्टफोन 3,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 25,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तसंच, Poco F1 ची विक्री देखील 14,999 रुपयांमध्ये केली जात आहे. हा स्मार्टफोन भारतात यापूर्वी 17,999 रुपयांमध्ये उपलब्ध होता. यामध्ये स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर आणि 4,000mAh क्षमतेची बॅटरी आहे. सेलमध्ये ग्राहक एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट इएमआयचा लाभ देखील घेऊ शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 11:28 am

Web Title: xiaomi mi super sale check offers on poco f1 redmi k20 redmi note 7 pro and more sas 89
Next Stories
1 Video: लोकल आणि एक्सप्रेसची धडक; थरकाप उडवणारा अपघात CCTV मध्ये कैद
2 Xiaomi Redmi Note 8 चा सेल, 1120 जीबी 4G डेटाची ऑफर
3 ‘पवारांनी कमळ बघितलं आणि तुमचा माज उतरवला’; राष्ट्रवादी समर्थकांचा फडणवीसांना टोला
Just Now!
X