News Flash

शाओमीने लाँच केला नवा POCO स्मार्टफोन, जाणून घ्या खासियत

ख्रिसमसच्या मुहूर्तावर शाओमी कंपनीने आपला नवा POCO स्मार्टफोन भारतात लाँच केलाय

ख्रिसमसच्या मुहूर्तावर शाओमी कंपनीने आपला नवा POCO स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. POCO Armoured Edition असं या स्मार्टफोनचं नाव असून फ्लिपकार्ट आणि Mi.com वर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. 23 हजार 999 रुपये इतकी या स्मार्टफोनची किंमत ठेवण्यात आलीये.

6GB रॅम आणि 128GB इंटरनल मेमरी असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 6.1 इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले (18.7:9 अॅस्पेक्ट रेशो )देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजेंसशी निगडीत अनेक फिचर्स देण्यात आलेत. यामध्ये Android 8.1 Oreo कस्टम सॉफ्टवेअर आहे. याशिवाय, फोनच्या मागील बाजूला 12 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. तसंच सेल्फीप्रेमींसाठी 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलाय. 4000 mAh ची बॅटरी फोनमध्ये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 1:39 pm

Web Title: xiaomi poco f1 armoured edition launched india
Next Stories
1 जाणून घ्या कशी होते ख्रिसमस ट्रीची शेती
2 Merry Christmas 2018 : …म्हणून २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो ख्रिसमस
3 National Consumers day : ग्राहक म्हणून तुम्हाला या हक्कांबद्दल माहित आहे का?
Just Now!
X