१४ मार्च रोजी शिओमी कंपनीने आपला बहुप्रतिक्षित शाओमी रेडमी नोट ५ दाखल केला. काही दिवसांपूर्वी या फोनचे फिचर्स लिक झाले होते. अॅमेझॉन इंडियावरुन ग्राहकांना हा फोन खरेदी करता येणार असल्याचेही कंपनीने सांगितले होते. एमआय डॉट कॉमवरुन या स्मार्टफोनच्या लाँचिंगचा सोहळा लाईव्ह दाखवला. कंपनीने आपल्या या नव्या फोनचे मार्केटींग चांगले केले असून ग्राहकांमध्ये तो कमी कालावधीत लोकप्रिय झाला आहे. या नव्याने आलेल्या फोनचा खप भारतात वाढावा यासाठी कंपनीने विशेष ऑफर्स जाहीर केल्या आहेत.

उद्या म्हणजेच २० मार्चपासून कंपनीचा विशेष सेल सुरु होणार असून तुम्ही जर नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर हा फोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो. http://www.amazon.in आणि http://www.mi.in या वेबसाइटसवर तुम्ही हा फोन खरेदी करु शकता. यावर वेगवेगळी डिस्काऊंटस मिळणार आहेत. स्टेटबँकेच्या क्रेडिट कार्डवरुन हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना ५ टक्के डिस्काऊंट देण्यात येणार आहे. याशिवाय किंडल ईबुकवर ९० टक्के डिस्काऊंट मिळेल. याशिवाय तुम्ही जिओचे कार्ड वापरत असाल आणि तुम्ही हा फोन खरेदी केला तर तुम्हाला २२०० रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळू शकते. २० तारखेला सकाळी १२ वाजता याचा ऑनलाइन सेल सुरु होणार आहे.

या फोनमध्ये १६, ३२ आणि ६४ जीबी असे वेरियंट देण्यात आले आहेत. त्यांची किंमत अनुक्रमे ७,९९९ रुपये, ८,९९९ रुपये आणि १०,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनला ४ हजार मिलीअॅम्पियरची बॅटरी देण्यात आली असून त्यात ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यातला एक कॅमेरा १६ मेगापिक्सेल आणि दुसरा ५ मेगापिक्सेल असण्याची शक्यता आहे. या फोनचा डिस्प्ले ५.९९ इंचांचा असेल. ३ जीबी रॅमचा ३२ जीबी मेमरी असलेला आणि ४ जीबी रॅमचा ६४ जीबी मेमरी असलेले असे दोन क्षमतांचे फोन उपलब्ध आहेत. याशिवाय १२८ एक्स्पांडेबल मेमरी असेल असेही सांगण्यात आले आहे. काळा, रोज गोल्ड, निळा, लाल, ग्रे आणि सिल्व्हर या रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे अशी माहिती ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस व्हायरल झाली होती.