शाओमी कंपनीचा नवा बजेट स्मार्टफोन रेडमी 6 खरेदी करण्याची आज संधी आहे. फ्लिपकार्ट आणि mi.com या संकेतस्थळांवर आज हा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. याच महिन्यात रेडमी 6, रेडमी 6ए आणि रेडमी 6 प्रो हे तीन स्मार्टफोन कंपनीने लॉन्च केले होते. रेडमी 6 ची खासियत म्हणजे हा बजेट स्मार्टफोन असून फोनच्या मागच्या बाजूला 12 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आणि सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

रेडमी 6 हा ड्युअल सिम स्मार्टफोन असून याच्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 7,999 रुपये आहे. तर, 3 जीबी रॅम व 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9,499 रुपये आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येणार आहे. सुरूवातीच्या दोन महिन्यांसाठी फोनची ही किंमत असेल, त्यानंतर मात्र फोनच्या किंमतीमध्ये वाढ होऊ शकते, असं कंपनीने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. ब्लॅक, गोल्ड, रोज गोल्ड आणि ब्लू कलर व्हेरिअंटमध्ये मिळेल. या फोनमध्ये तुम्हाला अॅन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो मिळेल.

स्पेसिफिकेशन्स –
डिस्प्ले – 5.45-इंच
प्रोसेसर – 2GHz octa-core
फ्रंट कॅमेरा – 5 मेगापिक्सल
रिझोल्यूशन – 720×1440 पिक्सल
रॅम – 3GB
ओएस – अॅन्ड्रॉइड 8.1 Oreo
स्टोरेज – 32GB
रिअर कॅमेरा – 12-मेगापिक्सल + 5- मेगापिक्सल
बॅटरी – 3000mAh