15 October 2019

News Flash

Xiaomi Redmi 6A : कॅशबॅकसह रिलायन्स जिओ देणार १०० जीबी जास्त डेटा

असा घ्या नव्या प्लॅनचा फायदा

रिलायन्स जिओने बाजारात प्रवेश करत आपल्या ग्राहकांना खुश केले आहे. सुरुवातीला मोफत कॉलिंग, मग मोफत इंटरनेट आणि नंतर स्वस्तातील मोबाईल लाँच करत कंपनीने ग्राहकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. नुकतीच शाओमी आणि रिलायन्स या दोघांनी मिळून एक भन्नाट ऑफर लाँच केली असून यामध्ये Redmi 6A खरेदी केल्यावर २ हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक आणि रिलायन्स जिओच्या ग्राहकांना १०० जीबीचा अतिरिक्त ४ जी डेटा मिळणार आहे. अॅमेझॉन इंडिया आणि Mi.com च्या वेबसाइटवर आज दुपारी १२ वाजल्यापासून हा सेल सुरु झाला आहे. काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या या फोनची किंमत ५,९९९ रुपये होती.

या फोनला २ जीबीची रॅम आणि १६ तसेच ३२ जीबी स्टोरेजची सुविधा आहे. मात्र या सेलमध्ये केवळ १६ जीबी स्टोरेजचा फोन खरेदी करता येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल ही तुमच्यासाठी नक्कीच उत्तम संधी ठरु शकते. या सेलसाठी शाओमी आणि रिलायन्स जिओ या दोन कंपन्या एकत्रित काम करत असल्याचे दिसत आहे. या फोनचा डिस्प्ले ५.४५ इंचाची आहे. तर या फोनला ३ हजार मिलीअॅम्पियर्सची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनला १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

First Published on January 7, 2019 3:57 pm

Web Title: xiaomi redmi 6a another flash sale today customer will get free internet data and cashback offer