शाओमी कंपनीने या महिन्याच्या सुरूवातीला भारतात आपला बजेट स्मार्टफोन रेडमी 6ए लॉन्च केला होता. आज बुधवारी या फोनचा भारतातील पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे. आज दुपारी Mi.com आणि Amazon.in या संकेतस्थळांवर दुपारी 12 वाजेपासून सेल सुरू होत आहे. मर्यादित संख्येत हा फोन सेलमध्ये उपलब्ध असेल अशी माहिती आहे.

Redmi 6A च्या 16 जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत 5,999 रुपये आहे, तर 32 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 6,999 रुपये आहे. दोन्ही व्हेरिअंट्समध्ये 2 जीबी रॅम असून मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येईल. सुरूवातीच्या दोन महिन्यांसाठीच फोनची ही किंमत ठरवण्यात आली असून त्यानंतर किंमतीत बदल केला जाऊ शकतो, असं कंपनीने सांगितलं आहे. आजच्या सेलमध्ये जिओ ग्राहकांना या स्मार्टफोनच्या खरेदीवर 2,200 रुपये कॅशबॅक आणि 100 जीबी जादा डेटा मोफत मिळेल.

Redmi 6A स्पेसिफिकेशन्स –
या स्मार्टफोनमध्ये 5.45 इंच एचडी+ (720×1440 पिक्सल) डिस्प्ले आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो ए22 प्रोसेसर आणि 2 जीबी रॅम आहे. 13 मेगापिक्सल सिंगल रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4जी VoLTE, ब्लूटूथ 4.2, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, जीपीएस/ए-जीपीएस, मायक्रो-यूएसबी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक यांसारखे पर्याय आहेत.
रेडमी 6ए मध्ये एक्सीलेरोमीटर, एम्बियंट लाइट सेंसर, इलेक्ट्रॉनिक कंपास आणि प्रॉक्सिमिटी सेंसर आहेत. 3000 एमएएच बॅटरी असून रेडमी 6ए ब्लॅक, गोल्ड, रोज गोल्ड आणि ब्लू कलरमध्ये उपलब्ध आहे.